
गडचिरोलीतून एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारांनी नक्षलवाद मुक्तीचा नारा दिला आहे. माओवाद्यांचे अनेक ठिकाणी कंबरडं मोडण्यातही मोठे यश आले आहे. अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा बिमोड झाला आहे. याच वर्षाअखेर नक्षलवादी चळवळ संपूर्ण पणे हद्दपार करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे माओवाद(moist) , माओवादी अजून संपले नाहीत, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. त्यासाठी जहाल माओवाद्याच्या हाती सूत्र देण्यात आली आहे. सरकारपुढे नवीन आव्हान उभं ठाकलं आहे.
जहाल देवा बटालियन कमांडर
गडचिरोली माओवाद संघटनेच्या मास्टर माईंड देवा याला माओवादी संघटनेत पदोन्नती बटालियन कमांडर ची जबाबदारी देण्यात आली. जहाल माओवादी हिडमा च्या ठिकाणी आता देवा काम करणार आहे. देवा हा वयाच्या आठव्या वर्षी माओवादी संघटनेत प्रवेश केला सध्या देवाची वय 40 ते 42 वर्ष आहे. त्याने मोठा काळ नक्षलवाद भागात व्यतीत केला आहे. त्याचे अनेक जहाल माओवाद्यांशी संबंध होते. तो दंडकारण्य परिसराशी चांगला परिचित असल्याची माहिती समोर येत आहे. किशोरवयीन मुलांना संघटनेत घेण्याची जबाबदारी आतापर्यंत त्याच्या खांद्यावर होती.
मोआवादी हिडमा, माओवादी देवा
बाल संगम ते बटालियन कमांडर
बाल संगम या संघटनेत छोट्या मुलांना माओवादी संघटनेत समाविष्ट करून घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य भूमिका देवा करतो. देवाने माओवादी संघटनेत अनेक पदांवर काम केले आहे. वेगवेगळ्या घातक बंदूक आणि स्फोटक पदार्थ तयार करण्यात मास्टर माईंड असलेला देवा बॅरेल ग्रॅनाईट लांचर स्वतः तयार करून छत्तीसगड मध्ये दोन मोठे हल्ल्याची जबाबदारी पार पाडली आहे. तो अत्यंत जहाल मानण्यात येतो. त्याने अनेकदा सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान उभं केलं होतं. त्याच्या रुपाने मृतवत होत चाललेल्या माओवादी संघटनेला ऊर्जा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. देवावर बटालियन कमांडरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सहा राज्यांची देवावर जबाबदारी
माओवादी संघटन कमजोर पडत असल्यामुळे छत्तीसगड राज्यासह महाराष्ट्र, तेलंगाना आंध्र प्रदेश,उडीसा झारखंड अशा सहा राज्याची जबाबदारी देवा याला देण्यात आली आहे. दलित समाजात जन्म घेतलेला देवा हा आता सध्या माओवादी संघटनेत मोठ्या पदावर काम करीत आहे. दंडकाऱ्यांना झोनल कमिटी, रीजनल कमिटी, डिव्हिजन कमिटी, डिव्हिजनल सेक्रेटरी अशा पदावर त्यानं काम केलं आहे.
छत्तीसगड आणि उडीसा राज्यातील महिलांनाही मोठे ऑफर देऊन माओवादी संघटनेत प्रवेश करण्याची जबाबदारी देवाकडे आहे. पाच ते सहा राज्याची पोलिस या देवाच्या मागावर आहे. केंद्रीय गृह विभागामार्फत देवाला चकमकी ठार किंवा अटक करण्यासाठी अनेक बैठका केंद्रीय गृह विभागाने घेतल्याची माहिती समोर येत आहे.