Nagpur BJP : भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली का?, जिल्हा कार्यकारिणी बैठकांचा सपाटा, बुथ सक्षमीकरण अभियान

| Updated on: Aug 05, 2022 | 2:39 PM

हर घर तिरंगा ही मोहीम भाजप राबविणार आहे. बुस्टर डोज हा प्रत्येक घरी पोहचला पाहिजे. केंद्रीय स्तरावर ज्या योजना राबविल्या त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचली पाहिजे. गरीब कल्याणाच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे.

Nagpur BJP : भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली का?, जिल्हा कार्यकारिणी बैठकांचा सपाटा, बुथ सक्षमीकरण अभियान
जिल्हा कार्यकारिणी बैठकांचा सपाटा, बुथ सक्षमीकरण अभियान
Follow us on

नागपूर : भाजपने राज्यभरात जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकांचा सपाटा लावलाय. या महिन्यात राज्यभर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका घेणार आहे. त्याची सुरुवात झालीय. त्यामुळेच भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलीय, अशी चर्चा सुरु झालीय. राज्यात 97 हजार 443 बुथवर सशक्तीकरण (Booth Empowerment) अभियान (Abhiyan) राबवत आहे. एका बुथवर 30 कार्यकर्ते तयार करण्यात येणार आहेत. भाजपने राष्ट्रीय स्तरावर दिलेले कार्यक्रम राबवणार, असं म्हणत भाजप नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते. उद्या निवडणूक लागली तरीही भाजप तयार आहे असं भाजप प्रदेश सरचिटणीस (State General Secretary) आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज भाजपच्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका आहेत. वर्धाच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर राहणार उपस्थित राहणार आहेत. नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

पाहा व्हिडीओ

बुथवर तीस पदाधिकाऱ्यांची फळी तयार करणार

भाजपकडून राज्यात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. महाराष्ट्राची कार्यकारिणी पनवेलमध्ये झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे तेराशे प्रतिनिधी तिथं उपस्थित होते. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठका झाल्यावर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका घ्याव्याचं लागतात. एका बुथवर तीस पदाधिकाऱ्यांची फळी तयार केली जाते. राज्यातील प्रत्येक बुथवर हे सक्षमीकरण अभियान सुरू झालं आहे.

हे सुद्धा वाचा

बुस्टर डोस घरोघरी पोहचला पाहिजे

हर घर तिरंगा ही मोहीम भाजप राबविणार आहे. बुस्टर डोज हा प्रत्येक घरी पोहचला पाहिजे. केंद्रीय स्तरावर ज्या योजना राबविल्या त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचली पाहिजे. गरीब कल्याणाच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. त्यानंतर काही दिवसात तालुका कार्यकारिणी होणार आहेत. कोअर गृपच्या सदस्यांनी जास्तीत-जास्त बैठका अटेंड कराव्यात असे पक्षाचे निर्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. पक्षाचं काम वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.