Nagpur Crime | भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!

रात्री दारू पिऊन रोहित घरी आला. त्याला पत्नीने हटकले. त्यामुळं त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

Nagpur Crime | भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 9:35 AM

नागपूर : रोहित आणि निकीता हे भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे. अठराव्या वर्षी दोघांनी प्रेम केले. घरचा विरोध होता म्हणून पळून नागपूरला आले. इथं संसार थाटला. त्यांना चार महिन्यांचा मुलगा आहे. पण, रोहितला दारूचे व्यसन लागले. बायकोने हटकले म्हणून त्याने चक्क गळफास लावला. रोहित मुकेश शिंगाडे (20, रा. तुमसर) असे मृत युवकाचे नाव आहे. दोन वर्षांतच त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना राजीवनगरात घडली.

बायकोने हटकले म्हणून लावला गळफास

रोहित शिंगाडेचे शेजारी राहणाऱ्या निकिताशी प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाची चर्चा पंचक्रोशीत पसरली. निकिताच्या कुटुंबीयांनी तिला विरोध केला. तिचे शिक्षणासाठी बाहेर पडणे बंद केले. दोघेहे नागपुरात पळून आले. त्याने एमआयडीसीतील एका कंपनीत काम शोधले. दोघांनीही सुखी संसार सुरू केला. त्यांना चार महिन्यांचा मुलगा आहे. मात्र, यादरम्यान रोहितला दारूचे व्यसन जडले. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. दारू पिण्यास निकिता विरोध करत होती. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. 28 डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन रोहित घरी आला. त्याला पत्नीने हटकले. त्यामुळं त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

देहव्यापार करून घेणाऱ्या महिलेला अटक

दुसऱ्या घटनेत, शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत पैशाच्या आमिषाने मुलींकडून देहव्यापार करून घेणार्‍या महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक पथकाने अटक केली. व्यवसाय चालत असलेल्या तिच्या भाड्याच्या रुमवर पथकाने धाड टाकली. आरोपी महिला रत्ना धमेंद्र भालाघरे (वय 32) बाबनगर येथील सदाशिव वरघने यांच्या घरी भाड्याने राहत होती. तिने आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त केले. आमिषाला बळी पडलेल्या मुलींना भाड्याच्या घरात ग्राहक पुरवित होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या ठिकाणी सापळा रचला. त्यांनी एक बोगस ग्राहक या ठिकाणी पाठविला. त्यानंतर येथे धाड टाकली. कारवाईत या भाड्याच्या घरात देहव्यापार करण्याकरिता दोन मुली सापडल्या. पथकाने या मुलींची सुटका केली.

Video-Bhandara | आमदार कारेमोरेंचा ठाण्यात गोंधळ! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले; पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा, नेमकं काय चाललंय भंडाऱ्यात?

Nagpur Corona | कोरोनाचा आणखी एक बळी, 54 पॉझिटिव्ह, बालकांचे लसीकरण लवकरच

Ration grain | रेशनच धान्य गरिबांना कमी, बाजारात जास्त; नागपुरात नेमकं चाललंय काय?