Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टीने घेतला 105 जणांचा बळी, 189 प्राणी दगावले, 11 हजार 836 जणांना सुरक्षित स्थळी हलविले

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 113 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत.

Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टीने घेतला 105 जणांचा बळी, 189 प्राणी दगावले, 11 हजार 836 जणांना सुरक्षित स्थळी हलविले
वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136 मि.मी. सरासरी पाऊस
Image Credit source: t v 9
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 18, 2022 | 5:43 PM

नागपूर : राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र (shelter center) तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे (heavy rain) 105 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. 189 प्राणी दगावले आहेत. राज्यात वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136 मि.मी. सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात (flood water) अडकलेत. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 15.9 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दिवसा अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ते सकाळी सहा वाजतापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर – कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

गडचिरोलीतील अनेक मार्ग खंडीत

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 113 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आला आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 606 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी 35 मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडिगडा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले आहेत. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 136.4 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता NDRF टीम व दोन SDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या तैनात आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 7 तुकड्या आहेत. मुंबई -3, पुणे-2 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2, अशा एकूण 2 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें