Nagpur | युक्रेनमध्ये अडकलेल्या किती जणांशी सरकारचा संपर्क? विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था काय

| Updated on: Feb 26, 2022 | 10:43 AM

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात राज्य शासन आहे. प्रशासनस्तरावर बैठका सुरू आहे. त्यांना परत आणण्यासाठी काय करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Nagpur | युक्रेनमध्ये अडकलेल्या किती जणांशी सरकारचा संपर्क? विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था काय
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेत आहेत. मीदेखील मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने सर्व परिस्थिती पाहत आहे. आम्ही राज्य सरकारची टोल प्री फोनलाईन (Toll Pre Phoneline) सुरू केली. शिक्षण विभागाकडून आकडेवारी आली आहे. 1200 च्या आसपास विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. 342 जणांशी आमचा संपर्क झाला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले, जे आज परतत आहेत, त्यांना आम्ही घरापर्यंत पोहचविणार आहोत. केंद्राने मदतीची तयारी केली आहे. परंतु जर मदत नाही झाली तर राज्य सरकार त्या विद्यार्थ्यांना तिकिटाच्या पैशांची मदत करेल. आज संध्याकाळपर्यंत किती विद्यार्थी परत येणार आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल.

विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहचविणार

महाराष्ट्रातील एक हजार दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. त्यातले काही विद्यार्थी आज मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरांपर्यंत राज्य सरकार पोहोचवणार आहे. आपले विद्यार्थी सुरक्षित आहेत. पण त्यांना पाणी आणि जेवनाची समस्या जाणवत आहे. राज्य सरकार आपल्या दुतावासाशी संपर्कात आहे. विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याबाबत आज सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास हेल्पलाईन

विदर्भातील 41 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती काल सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे आलीय. यात नागपूर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये युद्धामुळे मुलांचा जीव धोक्यात असल्याने पालक चिंतेत आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास हेल्पलाईन सुरू करण्यात आलीय. पालकांनी 0712- 2562668 या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह…!

Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!