नागपूर : शनिवारी आणि रविवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह (Poet Suresh Bhat Hall at Nagpur) येथे युनिक कलेक्शन आणि कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महापालिका आणि छंद सम्राट बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आलंय. शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन करतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंते राजे डॉ. मुधोजी भोसले (Shrimant Raje Dr. Mudhoji Bhosale ) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, छंद सम्राट बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिलीप डाहाके, उपाध्यक्ष सुनील रेड्डी, सचिव गणेश डुमरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृहात कला रसिकांसाठी प्रदर्शनी सुरू राहील. प्रदर्शनीमध्ये विविध युनिक कलेक्शन असलेल्या संग्रहांसह शहरासह बाहेरील अनेक सहभागी सहभाग घेणार आहेत.