हिवाळी अधिवेशनाचा अंतिम निर्णय मुंबईत, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. प्रशासनाकडून आमदार निवास, विधानभवन परिसर, इंटरनेट सेवा, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय याचा आढावा घेण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशनाचा अंतिम निर्णय मुंबईत, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
हिवाळी अधिवेशन
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 8:03 AM

नागपूर : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन नेहमी नागपूरला होत असते. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात आले होते. मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय मुंबईत होणार असल्याचं सांगितलं आहे.

दत्तात्रय भरणे यांच्याकडून तयारीचा आढावा

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय मुंबईतचं होणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

7 डिसेंबरपासून अधिवशेन

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रस्तावित हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. प्रशासनाकडून आमदार निवास, विधानभवन परिसर, इंटरनेट सेवा, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय याचा आढावा घेण्यात आला आहे. दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार?

विरोधी पक्ष भाजप हिवाळी अधिवशेनात राज्य सरकारविरोधात शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई,एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न यासंदर्भात आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, राज्य सरकार देखील विरोधकांना परमबीर सिंग बेपत्ता प्रकरण, 12 आमदारांचं निलंबन या मुद्यावरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; भाजपची महाविकास आघाडीला मदत, दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात!

“सर्टिफिकेटबाबत तक्रार आली तर चौकशी करु, बड्या मंत्र्याचं सूचक विधान,” समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ?

Azadi ka Amrit Mahotsav: सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी, देशभरातून मागवले अर्ज

Maharashtra Legislature Winter Session final decision will taken at Mumbai said by Dattatray Bharane