AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Azadi ka Amrit Mahotsav: सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी, देशभरातून मागवले अर्ज

या अर्जांची छाननी करुन निवड होणाऱ्या कलावंतांना गोव्यातील 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) विशेष निमंत्रित म्हणून प्रवेश मिळेल. तसेच या सर्वांना कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. | 75 ???????? ????? ?? ????????

Azadi ka Amrit Mahotsav: सृजनशील कलावंतांना मोदी सरकारची अनोखी संधी, देशभरातून मागवले अर्ज
आझादी का अमृत महोत्सव
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Azadi ka Amrit Mahotsa) केंद्र सरकारकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सृजनशील कलाकारांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकने देशभरातून अर्ज मागवले आहेत. 1 नोव्हेंबर 2021 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत असेल.

या अर्जांची छाननी करुन निवड होणाऱ्या कलावंतांना गोव्यातील 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) विशेष निमंत्रित म्हणून प्रवेश मिळेल. तसेच या सर्वांना कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल.

कोणी अर्ज करावा?

दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण, साऊंड रेकॉर्डिंग, पार्श्वगायन, लेखन आणि प्रोडक्शन डिझाईन यापैकी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती ’75 ???????? ????? ?? ????????’ या स्पर्धेसाठी अर्ज करु शकते.

अटी काय?

संबंधित स्पर्धकाकडून पाठवण्यात येणारा व्हीडिओ किंवा ऑडिओ पाच ते दहा मिनिटांचा असावा. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तीचे वय 35 पेक्षा जास्त नसावे. तसेच स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारा चित्रपट तीन वर्षांपेक्षा जुना नसावा.

अर्ज कसा कराल?

* स्पर्धकांनी त्यांचा अर्ज स्कॅन करुन india75.iffi@gmail.com या अॅड्रेसवर मेल करावा. www.dff.gov.in आणि www.iffigoa.org या दोन संकेतस्थळांवरुन अर्ज डाऊनलोड करता येईल. * प्रत्येक अर्जात संबंधित उमेदवाराच्या चित्रपट कलाकृतींचा आणि त्यामध्ये त्यांच्या असलेल्या योगदानाचा सविस्तर उल्लेख असावा. * सरकारी ओळखपत्र * शिफारस पत्र * घोषणापत्र * संबंधित स्पर्धकाकडून पाठवण्यात येणारा व्हीडिओ किंवा ऑडिओ पाच ते दहा मिनिटांचा असावा. * 1 नोव्हेंबर 2021 नंतर पाठवण्यात येणारे अर्ज बाद ठरवले जातील. * कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास उमेदवार india75.iffi@gmail.com याठिकाणी ई-मेल पाठवू शकतात.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

* निवड समितीमध्ये चित्रपट क्षेत्रातील प्रतिथयश लोकांचा समावेश असेल. * ही समिती सगळ्या कलाकृतींमधून अंतिम 150 स्पर्धकांची निवड करेल. * निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. त्याविरोधात कोणतेही अपील करता येणार नाही.

संबंधित बातम्या:

जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल

Azadi Ka Amrit Mahotsav | कृषीक्षेत्र ते सेवाक्षेत्र, अर्थजगतात स्वतंत्र भारताचा समृद्ध प्रवास!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.