34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर

| Updated on: Nov 23, 2021 | 8:33 AM

छोटू भोयर हे 1987 पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या 34 वर्षांपासून भाजपमध्ये होते.

34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर
Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule
Follow us on

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकांची (Maharashtra Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार पाठोपाठ काँग्रेसने नागपूरचाही (Nagpur) उमेदवार जाहीर केला आहे. भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar aka Chhotu Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपतर्फे (BJP) माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विरुद्ध काँग्रसचे छोटू भोयर अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी छोटू भोयर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

कोण आहेत छोटू भोयर?

छोटू भोयर हे 1987 पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या 34 वर्षांपासून भाजपमध्ये होते. छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. 20 वर्षे ते नगरसेवक राहिलेत. नागपूरचे उपमहापौरपदही त्यांनी भूषवले होते. छोटू भोयर यांनी नागपूर महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक सुद्धा आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते.

भोयर सामाजिक कामात अग्रेसर

छोटू भोयर यांचा सामाजिक सेवेत नेहमी पुढाकार राहिला. त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. जनतेची सेवा केली. या त्यांच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुकही केले होते. त्यामुळं कुणावरही नाराजी नसल्याचं त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.

नितीन गडकरींनी भाष्य टाळलं

भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. पत्रकारांनी छोटू भोयर यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यावर दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. क्रीडा मंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी छोटू भोयर यांना ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छोटू भोयर हे आजपर्यंत भाजपशी एकनिष्ठ होते. मात्र अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

व्हायरल झालेले पोस्टर

2019 मध्ये छोटू भोयर यांचे पोस्टर व्हायरल झाले होते. त्या पोस्टरवर विनीत म्हणून सारू प्रिटर्सचे मालक महेंद्र कठाणे यांचं नाव होतं. 2018 मध्ये छोटू भोयर यांनी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्तदान शिबिर घेतले होते. त्यासंदर्भात हे पोस्टर होते.

संबंधित बातम्या :

छोटू भोयरांचा काँग्रेस प्रवेश : भाजपच्या पराभवाची नांदी – नितीन राऊत

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज, भाजपचे नगरसेवक छोटू भोयर काँग्रेसमध्ये