वंचितला सोबत घेणार की नाही?; मविआत नेमकं काय घडतंय? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Mar 26, 2024 | 3:47 PM

Congress Leader Nana Patole on Vanchit Mahavikas Aghadi : वंचितबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय?; महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय? लोकसभा निवडणूक अन् काँग्रेसची भूमिका, याबाबत नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं... नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर......

वंचितला सोबत घेणार की नाही?; मविआत नेमकं काय घडतंय? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Follow us on

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशात महाविकास आघाडीचं राज्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही? याबाबतच संभ्रम कायम आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नागपुरात आज पत्रकार परिषद झाली. यावेळी पटोले यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं. महाविकास आघाडीमध्ये किती जागा देणार हा चर्चेचा भाग नाही. आघाडीचं स्पष्ट होत नाही. तोपर्यंत आम्ही त्यांना चर्चा बाहेर करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबरच राहतील. यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही ते कळवलं आहे.आज कुठल्याही परिस्थितीत त्यावर मध्यस्थी करून निर्णय घेतील, असं नाना पटोले म्हणाले.

गडकरींना टोला

सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढवण्याचे काम केले. त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये. नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल, असा सल्ला त्यांना आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं. नागपूरची जनता हे सुजाण आहे. नागपूरचा उमेदवार हे स्वतःला बलाढ्य समजून पंतप्रधानपदाचा उमेदवार मीच असल्याचं 2014 मध्ये सांगितलं. 2019 मध्ये तेच सांगितलं. पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचे पावले नरेंद्र मोदी यांनी उचलले. त्या सगळ्याला यांनी समर्थन केल्याने त्या पापाचे वाटेकरी हे आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला.

ही अन्यायाविरोधातील लढाई- पटोले

नागपुरात भाजप विरोधी परिस्थिती आहे. विदेशात कोणाच काय आहे..चर्चा करायची असेल तर विचारावर चर्चा करावी. भाजपला कशासाठी मतदान करायचं काय. काय त्यांनी महागाई कमी केली. शेतकऱ्यांना न्याय दिला, असं कुठेही चित्र नसताना उलट गरिबी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई अन्याय विरोधात महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही लढाई लढत आहे, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेसने 25 प्रकारची गॅरेंटी दिली आहे… बेरोजगारांना नोकरी नोकरी देऊन नाही देऊ शकलो तर त्यांना पैसे देण्या संदर्भात आम्ही गॅरेंटी दिली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू यासारखे 25 आश्वासन दिलं आहे, असंही पटोले म्हणाले.