नागपूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये, थकबाकीदार रडारवर, मालमत्तांचे लिलाव सुरु

| Updated on: Sep 01, 2021 | 3:37 PM

कर वसूलीचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपा आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. मालमत्ता लिलावाच्या माध्यमातून विक्रीची सक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आलीय.

नागपूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये, थकबाकीदार रडारवर, मालमत्तांचे लिलाव सुरु
नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर: नागपूर महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. नागपूर पालिका प्रशासन देखील एका मोहिमेवर आहे. पालिका प्रशासनानं मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध आता नागपूर महानगरपालिकेने कंबर कसलीय. जे थकबाकीदार कर भरणार नाही त्यांची मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पालिकेनं या संदर्भात प्रत्यक्ष कारवाईला देखील सुरुवात केली आहे.

थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव

कर वसूलीचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपा आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. मालमत्ता लिलावाच्या माध्यमातून विक्रीची सक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आलीय. नागपूर मनपाने कर थकवणाऱ्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

पालिकेनं कुठं कुठं कारवाई केली

हनुमाननगर झोन क्र. ३ च्या कार्यक्षेत्रातील युनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नरेन्द्र नगर, विकास सोसायटी, नरेन्द्र नगर आणि विश्वजीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील सहा भूखंडाची, धरमपेठ झोन कार्यक्षेत्रातील महादेव नगर, जी.एन.एस.एम गव्हर्नमेंट प्रेस एम्प्लॉईज सोसायटी, बंधू गृहनिर्माण आणि हिल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सहा भूखंडाची विक्री करून आणि लक्ष्मीनगर झोनच्या कार्यक्षेत्रातील श्रीमती वृंदा दाऊ यांच्या बंगल्याची विक्री करून मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यात आलीय.

कर भरा, लिलाव टाळा पालिकेंचं आवाहन

कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं पालिकेचं उत्पन्न कमी झालं आहे. नागपूर महापालिकेला राज्यातील इतर महापालिकांसारखाच फटका बसला आहे. त्यामुळे नागपूर पालिकेच्यावतीनं थकबाकीदारांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नागरकिकांनी वेळीच मालमत्तेचा थकीत कर भरा आणि मालमत्तेचा लिलाव टाळा, असं आवाहन नागपूर महानगरपालिका प्रशासनाने केलंय.

नागपूर महापालिका निवडणुकीचं वातावरण तापलं

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसनं आता राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसतंय. नागपूर मनपा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने नागपुरात अंतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे संकेत आहेत. ‘पाच वर्षात केलेल्या कामाबाबत करणार सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येतेय. काँग्रेसच्यावतीनं शहरातील 151 प्रभागात उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ‘निवडूण येणाऱ्या उमेदवारांनाच दिलं जाणार निवडणुकीचं तिकीट देण्यात येणार आहे. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलीय. या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने जोरात तयारी सुरु केलीय. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी नागपुरात काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे सुरु झालाय. या सर्व्हेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या कामाची माहिती घेणे, नगरसेवकांच्या कामगिरीबाबत मतदारांचं काय मत आहे, शिवाय संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी करण्याचं काम पक्षाकडून केलं जातंय. ‘गेल्या पाच वर्षात समाधानकारक कामगीरी नसलेल्या नगरसेवकांना पक्ष घरचा रस्ता दाखवणार असून, या सर्वेच्या माध्यमातून काँग्रेस नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार होतंय, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

काँग्रेसचं नागपूर मनपा निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरु, नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड निघणार, स्वबळाच्या तयारीचे संकेत?

कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता संचालकांची; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nagpur Municipal Corporation taken action who does not pay property tax done auction