नागपूर मेट्रोच्या एमडीवर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप, ED चौकशीची राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

| Updated on: Aug 04, 2021 | 5:33 PM

नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याने मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप करत, ED चौकशी मागणी केलीय.

नागपूर मेट्रोच्या एमडीवर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप, ED चौकशीची राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
मेट्रो
Follow us on

नागपूर: काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यासोबत पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवली. तर, इकडे नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याने मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर मेडिकल बील घोटाळ्याचा आरोप करत, ED चौकशी मागणी केलीय. नागपूर मेट्रोच्या एमडीसह इतर संचालकांनी तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे मेडीकल बिलाचे पैसे घेतले आहेत. कोट्यवधीचे मेडिकल बिल घेतलेल्या मेट्रोच्या संचालकांना नेमका कुठला आजार झालाय? असा सवाल जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी उपस्थित केलाय. मेट्रोच्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणीही त्यांनी केलीय.

मेट्रोच्या संचालकांनी किती रुपये मेडिकल बिल घेतलं?

संचालक तीन वर्षांतील मेडिकल बिल

– ब्रिजेश दिक्षीत, MD : 1 कोटी 15 लाख रुपये
– महेश कुमार, WTD : 21 लाख 80 हजार रुपये
– सुनील माथुर, WITD: 43 लाख रुपये
– एस शिवानाथन, CFO: 21 लाख रुपये
– रामनाथ सुब्रमानियम, WTI  :2कोटी रुपये

मेट्रोच्या संचालकांना घरी पाठवण्याची मागणी

नागपूर मेट्रोच्या एमडीवर आता मेडीकल बील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. एमडी ब्रिजेश दिक्षीत यांचे एका वर्षात तब्बल 64 लाखांचे मेडीकल बील झाल्याचा दावा जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केला आहे. ब्रिजेश दीक्षित यांचे तीन वर्षाचं मेडिकल बील सव्वा कोटी पेक्षा जास्त झाल्याचं प्रशांत पवार यांनी म्हटलं आहे. ‘मेट्रोच्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्याची केली मागणी’ देखील त्यांनी केलीय.

ED चौकशीची मागणी

नागपूर मेट्रोच्या इतर संचालकांचेही लाखो रुपयांचे मेडीकल बील झालं आहे. मेट्रोत मेडिकल बिलाचा घोटाळा झाल्याचा प्रशांत पवार यांचा आरोप करत मेडीकल बिल घोटाळ्याच्या ED चौकशीची मागणी करण्यात आलीय. कोट्यवधीचे मेडिकल बिल घेतलेल्या मेट्रोच्या संचालकांना नेमका कुठला आजार? झालाय, असा सवाल देखील त्यांनी केलाय.

वेगवेगळे हेड्स असल्याने बिलाचा आकडा जास्त दिसतो

दरम्यान, प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोत मेडीकल बिलाच्या घोटाळ्याचा हा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी प्रशांत पवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मेडीकल बिल्समध्ये वेगवेगळे हेड्स असल्याने बिलाचा आकडा जास्त दिसतो, असं मेट्रोच्या पीआरओंनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

राहुल गांधींसोबतच्या फोटोची जोरदार चर्चा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

अमित शाह-शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Nagpur NCP leader and Jay Jawan and Jay Kisan orgnaization president Prashant Pawar alleged medical bill scam in Nagpur Metro demanded ED enquiry