राहुल गांधींसोबतच्या फोटोची जोरदार चर्चा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

संजय राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान परिषद सदस्यांची नेमणूक आणि राहुल गांधी यांची भेट, त्यांच्यासोबतचा फोटो याविषयी बातचीत केली.

राहुल गांधींसोबतच्या फोटोची जोरदार चर्चा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
राहुल गांधी संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 10:38 AM

दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान परिषद सदस्यांची नेमणूक आणि राहुल गांधी यांची भेट, त्यांच्यासोबतचा फोटो याविषयी बातचीत केली.राहुल गांधी यांच्यासोबतच्या जवळीकीसंदर्भात शिवसेना आणि काँग्रेस हातात हात घालून काम करत आहेत.हातातला हात आता फक्त खांद्यावर आला इतकंच आहे. हातातला हात खांद्यावर आला यात वाईट काय आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या सोबतच्या फोटोवर राऊतांनी सूचक उत्तर दिलंय.

राहुल गांधी यांच्या सोबतच्या फोटोवर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच आहे. नक्कीच आमचे चांगलेच संबंध आहेत.एकत्र राज्य करताना आणि सरकार चालवताना फक्त पक्ष जवळ येऊन चालत नाही मनही जवळ यावी लागतात. त्या दृष्टीनं जर काही पावलं पडत असतील तर लोक नक्कीच त्याचं स्वागत करतील. शिवसेनाच्या नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मानाचं स्थान दिलं जातात. राहुल गांधी आणि माझी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे निरोप त्यांना दिलेलं आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रातील सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. राज्यातील सरकार आपण चालवायचं आहे त्यावर ते ठाम आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांनी गावपातळीवर दौरा करण्याची गरज नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर निशाणा साधल्यानंतर संजय राऊत यांनी देखील राज्यपालांना इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर तुमचाच पाय कुठेतरी गुंतून पडेल, असं राऊत म्हणाले. भारतीय राज्य घटनेनुसारराज्यपालांना अधिकार आहेत पण त्यासाठी गावपातळीवर दौरा काढण्याची गरज नाही. भाजपशासित राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील राज्यपाल असे दौरे करताना दिसत नाहीत. राज्यपालांचे काम अत्यंत मर्यादित स्वरूपाचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार, त्या सरकारला त्यांनीच शपथ दिली आहे. त्यांची राजकीय कारणांसाठी अडवणूक करु नये. विधान परिषदेचे 12 सदस्य आणि एमपीएससीचे सदस्य यांच्या नेमणुकीचा विषय असेल, अशा प्रकाराची अडवणूक राजकीय दबावाचा प्रकार असतो. राज्यपालांनी अशा प्रकारच्या वादात पडू नये. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात असं घडत आहे. त्यावर राज्य सरकारमधील नेते उत्तर देतील. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

संजय राऊत आणि राहुल गांधींची जवळीक वाढतेय?; पाहा हा फोटो काय सांगतो!

आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!

Sanjay Raut said Congress and Shivsena work together in Maharashtra on Photo with Rahul Gandhi

शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....