AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत आणि राहुल गांधींची जवळीक वाढतेय?; पाहा हा फोटो काय सांगतो!

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यातील वाढती जवळीक हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (rahul gandhi and sanjay raut meet together, read inside story)

संजय राऊत आणि राहुल गांधींची जवळीक वाढतेय?; पाहा हा फोटो काय सांगतो!
राहुल गांधी संजय राऊत
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 4:06 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यातील वाढती जवळीक हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधीही संजय राऊत यांच्याशी मित्रासारखे वागत असून गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत. त्यामुळे राऊत आणि राहुल यांच्या मैत्रीच्या चर्चांना उधाण आलं आहे. (rahul gandhi and sanjay raut meet together, read inside story)

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला संजय राऊत गेले होते. त्यानंतर कालही संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. राहुल यांनी आपल्याकडून शिवसेनेची कार्यप्रणाली समजून घेतल्याचं ट्विटच राऊत यांनी केलं आहे. तसेच आजच्या बैठकीलाही संजय राऊत हे राहुल यांच्या शेजारीच बसले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील घनिष्ट मैत्रीची चर्चा होत आहे. आता तर या दोन्ही नेत्यांचा फोटो व्हायरल झाल्याने या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

फोटो काय सांगतो?

आज राहुल गांधी यांनी ब्रेक फास्ट करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावलं होतं. यावेळी राऊत हे राहुल यांच्याच बाजूला बसले होते. नाश्त्याच्या टेबलवरही राऊत आणि राहुल गांधी जवळजवळ होते. ही बैठक झाल्यानंतर राहुल गांधी हे राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते. हाच फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकलेला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही तरी गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे. राऊतही तोंडावरचा मास्क काढून धीर राहुल यांच्या बोलण्याकडे कान देत गंभीरपणे ऐकताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांच्या नजरा जमिनीला खिळलेल्या दिसत आहे. आजच्या बैठकीला 100 खासदार उपस्थित होते. मात्र, त्यामध्ये राहुल यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हाच फोटो अपलोड केल्याने या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीसंबंधावर जोरदार चर्चा होत आहे.

राऊत काय म्हणाले?

आज सकाळी ब्रेक फास्ट मिटिंगला राऊत हजर होते. यावेळी राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडतानाच केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधानांची चाय पे चर्चा होते. आपली ब्रेक फास्ट चर्चा आहे. ब्रेक फास्ट चर्चेला जाणार का? असं मला सकाळी मीडियाने विचारलं. मी म्हटलं जाणारच. खरं तर आम्हाला पंतप्रधानांनी बोलवायला हवं होतं. पण ते त्यांच्याच लोकांना बोलावतात. आम्हाला पाणीही विचारत नाहीत. ते सर्वांचेच पंतप्रधान आहेत, असा चिमटा काढतानाच आपण सर्व आता नाश्ता करू आणि 2023च्या निवडणुकीची तयारीही करू, असं राऊत म्हणाले.

राऊतांचं ट्विट

राऊत यांनी काल राहुल यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत यांनी ट्विट केलं. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून राहुल गांधी आणि राऊत यांच्यात किमान तासभर तरी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. (rahul gandhi and sanjay raut meet together, read inside story)

संबंधित बातम्या:

आधी मोदींशी चर्चा, आता थेट अमित शाहांची भेट, शरद पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी

राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

पंतप्रधान तर आम्हाला पाणीही विचारत नाही, काँग्रेसच्या ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’ला शिवसेनेची साथ; यूपीएत सहभागी?

(rahul gandhi and sanjay raut meet together, read inside story)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.