पंतप्रधान तर आम्हाला पाणीही विचारत नाही, काँग्रेसच्या ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’ला शिवसेनेची साथ; यूपीएत सहभागी?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. या ब्रेक फास्ट चर्चेला 15 पक्षाचे 100 खासदार उपस्थित राहिले होते. (sanjay raut)

पंतप्रधान तर आम्हाला पाणीही विचारत नाही, काँग्रेसच्या 'ब्रेकफास्ट पॉलिटिक्स'ला शिवसेनेची साथ; यूपीएत सहभागी?
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 12:39 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. या ब्रेक फास्ट चर्चेला 15 पक्षाचे 100 खासदार उपस्थित राहिले होते. या बैठकीला शिवसेनेचे झाडून सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना त्यांनी भाजपला टोलेही लगावले. त्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये सहभागी झाल्याचं बोललं जात आहे. (shivsena attend rahul gandhi’s opposition leader meeting, now shiv sena is part of UPA?)

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, शिवसेना अद्यापही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएत अधिकृतपणे सहभागी झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने बोलावलेल्या सर्व बैठकांना शिवसेना हजेरी लावताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते. आजही राहुल गांधी यांनी विरोधकांची ब्रेकफास्ट मिटींग आयोजित केली होती. त्यालाही शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित राहिले. एवढेच नव्हेतर या मिटिंगमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिकाही मांडली. त्यामुळे शिवसेना यूपीएत सहभागी झाल्याची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेला मानाचं पान

या बैठकीत संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याच बाजूला बसले होते. शिवाय राहुल गांधी ज्या टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसले होते. त्या टेबलवर एकूण 11 नेते बसले होते. या टेबलवर स्वत: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल होते. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊतही होते. त्यामुळे काँग्रेसकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली जात असल्याचं स्पष्ट होत आहे. भविष्यात राष्ट्रवादीसोबत शिवसेनेलाही सोबत ठेवण्याचं काँग्रेसमध्ये घटत असल्याचंही या निमित्ताने दिसून येत आहे.

राऊत काय म्हणाले?

यावेळी राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडतानाच केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधानांची चाय पे चर्चा होते. आपली ब्रेक फास्ट चर्चा आहे. ब्रेक फास्ट चर्चेला जाणार का? असं मला सकाळी मीडियाने विचारलं. मी म्हटलं जाणारच. खरं तर आम्हाला पंतप्रधानांनी बोलवायला हवं होतं. पण ते त्यांच्याच लोकांना बोलावतात. आम्हाला पाणीही विचारत नाहीत. ते सर्वांचेच पंतप्रधान आहेत, असा चिमटा काढतानाच आपण सर्व आता नाश्ता करू आणि 2023च्या निवडणुकीची तयारीही करू, असं राऊत म्हणाले. (shivsena attend rahul gandhi’s opposition leader meeting, now shiv sena is part of UPA?)

संबंधित बातम्या:

राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

Explainer : विम्याबाबत सरकारचे मोठे पाऊल, देशातील प्रत्येक नागरिकाला विम्याचा लाभ मिळणार

पुणेकरांनो थोडी कळ सोसा; विजय वडेट्टीवार यांचं आवाहन

(shivsena attend rahul gandhi’s opposition leader meeting, now shiv sena is part of UPA?)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.