Rain : नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी! विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसला

काही भागात दीड ते दोन तास मुसळाधार पाऊस झाला. दरम्यान, आज (गुरुवारी ) सकाळपासून ढगाळ हवामान असून, तापमानातंही घट नोंदवली गेली आहे.

Rain : नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी! विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसला
पावसाची शक्यता
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 7:11 AM

नागूपर : नागपूरमध्ये (Nagpur Rain) मुसळधार पावसानं हजेरी लावली. बुधवारी रात्री नागपूरसह विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह मुसळाधार पाऊस झाला. या पूर्वमौसमी पावसाने (Pre monsoon Rains in Maharashtra) बळीराजा सुखावलाय. त्यामुळे खरिप पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. काही भागात दीड ते दोन तास मुसळाधार पाऊस झाला. दरम्यान, आज (गुरुवारी ) सकाळपासून ढगाळ हवामान असून, तापमानातंही घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे उन्हाच्या काहिलीपासून मुंबईसह महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण (Konkan Rain Update) किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम असणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ वातावरण गेल्या काही दिवसांत अनेकदा अनुभवलंय. कोकण विभागात मे महिन्यात तुलनेनं कमान तापमान चढे राहिलेले नव्हते. आता येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावासाची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय.

ऐका गावागावातल्या बातम्या :

ठाण्यात आज पावसाचा अंदाज

ठाणे जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. दरम्यान, मुंबईमध्ये वातावरण कोरडे असले तरी अंशतः ढगाळ असेल, असा अंदाज आहे. मात्र मुंबई पाऊस होण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

तळकोकणात जोरदार बरसणार

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाची होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर रायगडमध्ये पावसाचा जोर उद्या कमी असेल, असंही सांगितलं गेलंय. दरम्यान, रत्नागिरीमध्ये शनिवारी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज वर्तवला गेलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी मेघगर्जना किंवा हलक्या सरींची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटाची शक्यताय. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर शनिवारपासून कमी होण्याची शक्यताय. परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांची शक्यताय. तर मराठवाड्यातही शनिवारनंतर हळूहळू वारे, पाऊस याचा जोर कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.