कोंबडीपेक्षा मेथी-फरसबी महाग, भाजीपाल्याचे भाव अडीचशे पार

| Updated on: Jun 21, 2021 | 10:27 AM

नागपुरात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत (Nagpur Vegetable Price). नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबीन, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत

कोंबडीपेक्षा मेथी-फरसबी महाग, भाजीपाल्याचे भाव अडीचशे पार
Vegetables
Follow us on

नागपूर : नागपुरात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत (Nagpur Vegetable Price). नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत (Nagpur Vegetable Price Hike Became More Expensive Than Chicken Due To Damage By Heavy Rainfall).

आवक कमी झाल्याने सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात चिकनपेक्षाही भाजीपाला महागल्याची स्थिती आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झालंय. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीये. याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतोय.

भाज्या            दर प्रति किलो

मेथी               250 रुपये किलो

फरसबी         250 रुपये किलो

वाल               250 रुपये किलो

शेवगा             250 रुपये किलो

फ्लावर           120 रुपये किलो

वांगी               80 रुपये किलो

टोमॅटो            50 रुपये किलो

कोथिंबीर        120 रुपये किलो

पत्ताकोबी       80 रुपये किलो

दोडका          120 रुपये किलो

भेंडी              120 रुपये किलो

नागपुरात आजपासून रात्री 8 पर्यंत बाजार खुले

नागपूरमध्ये आजपासून बाजार रात्री 8 पर्यंत खुले राहणार आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत उघडे राहणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट टळले नसल्याने नागरिकांनी शिथिलता असली तरी काळजी घेण्याची गरज आहे.

मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी, दर वाढले

राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक आणि इतर ठिकाणावरुन भाजीपाल्याची आवक सुरु आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.

भाज्यांनी शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढ शंभरी पार केल्यानंतर भाज्याही महाग झाल्या आहेत आणि पावसामुळे आवक पण कमी झाली असल्यामुळे याचा परिणाम गृहींनींच्या बजेटवर झाला आहे. लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच विक्रेत्यांनाही 30 ते 40 टक्के फटका सहन करावा लागत आहे.

भाजी        दर प्रति किलो

मटार         100 रुपये किलो

भेंडी           40 रुपये किलो

फरसबी     100 रुपये किलो

वांगी          48 रुपये किलो

शिमला      32 रुपये किलो

शेंगा          40 रुपये किलो

पडवळ      60 रुपये किलो

गवार         60 रुपये किलो

कोबी         28 रुपये किलो

आलं          36 रुपये किलो

Nagpur Vegetable Price Hike Became More Expensive Than Chicken Due To Damage By Heavy Rainfall

संबंधित बातम्या :

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका फळभाज्यांना, गृहिणींचे बजेट कोलमडले

Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर