AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today)

Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
| Updated on: May 31, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतींमध्ये पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सरकारी तेल कंपन्यांनी (OMC’s) पेट्रोलच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 31 मे 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 31 May 2021)

पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पुढे

यापूर्वी गेल्या रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. आज मे महिन्यातील 17 वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर डिझेलची किंमत ही प्रतिलीटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक

मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. आजपासून पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. पुण्यात पेट्रोलचा दर हा 34 पैशांनी वाढला आहे. तर डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोल हे प्रतिलीटर 100.15 रुपये इतके झाले आहे. तर डिझेलचा दर हा 90.71 रुपये इतका आहे. त्याशिवाय मुंबईत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोल हे 100.53 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत डिझेलचा दर 92.50 रुपये एवढा आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर              पेट्रोल (रुपये/लीटर)  डीज़ल (रुपये/लीटर)
नवी दिल्‍ली 94.23 85.15
मुंबई 100.47 92.45
कोलकाता 94.25 88
चेन्‍नई 95.76 89.90
नोएडा  91.72 85.62
बंगळूर 97.37 90.27
हैदराबाद 97.93 92.83
पाटणा 96.38 90.42
जयपूर 100.75 93.95
लखनऊ 91.63 85.54
गुरुग्राम 92.07 85.74
चंदीगढ 90.64 84.81

इंधन दरवाढ कायम 

मे महिन्याआधी कित्येक महिने किरकोळ इंधन दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. पण 4 मेपासून सुरु झालेली इंधन दरवाढ सातत्याने कायम आहे. या महिन्यात आतापर्यंत 17 दिवसांत पेट्रोल प्रतिलीटर 3.88 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेल प्रतिलीटर 4.42 रुपयांनी महाग झाले आहे.

पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 100.25 ₹ 90.81
2 अकोला ₹ 100.09 ₹ 90.69
3 अमरावती ₹ 101.34 ₹ 91.89
4 औरंगाबाद ₹ 100.66 ₹ 91.21
5 भंडारा ₹ 101.01 ₹ 91.58
6 बीड ₹ 101.43 ₹ 91.97
7 बुलडाणा ₹ 101.43 ₹ 91.95
8 चंद्रपूर ₹ 100.22 ₹ 90.83
9 धुळे ₹ 100.66 ₹ 91.22
10 गडचिरोली ₹ 100.71 ₹ 91.30
11 गोंदिया ₹ 101.14 ₹ 91.70
12 मुंबई उपनगर ₹ 100.19 ₹ 92.17
13 हिंगोली ₹ 101.56 ₹ 92.11
14 जळगाव ₹ 100.83 ₹ 91.37
15 जालना ₹ 101.29 ₹ 91.82
16 कोल्हापूर ₹ 100.05 ₹ 90.65
17 लातूर ₹ 101.66 ₹ 92.19
18 मुंबई शहर ₹ 100.19 ₹ 92.17
19 नागपूर ₹ 100.02 ₹ 90.62
20 नांदेड ₹ 102.54 ₹ 93.04
21 नंदूरबार ₹ 101.35 ₹ 91.88
22 नाशिक ₹ 100.21 ₹ 90.77
23 उस्मानाबाद ₹ 100.67 ₹ 91.23
24 पालघर ₹ 100.14 ₹ 90.68
25 परभणी ₹ 102.27 ₹ 92.76
26 पुणे ₹ 100.15 ₹ 90.39
27 रायगड ₹ 99.77 ₹ 90.32
28 रत्नागिरी ₹ 101.47 ₹ 92.02
29 सांगली ₹ 100.45 ₹ 91.03
30 सातारा ₹ 100.58 ₹ 91.13
31 सिंधुदुर्ग ₹ 101.38 ₹ 91.92
32 सोलापूर ₹ 100.65 ₹ 91.22
33 ठाणे ₹ 99.89 ₹ 90.44
34 वर्धा ₹ 100.17 ₹ 90.76
35 वाशिम ₹ 100.61 ₹ 91.19
36 यवतमाळ ₹ 101.56 ₹ 92.11

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  (Petrol Diesel Price Fuel Rate Today 31 May 2021)

संबंधित बातम्या : 

कर्जाची परतफेड करण्यात अडचण, मग हा फॉर्म भरा, SBI चा मोठा दिलासा

EPFO मेंबर्ससाठी चांगली बातमी, कोरोनानं मृत्यू झाल्यावर मिळणार 7 लाख अन् कौटुंबिक पेन्शन

COVID personal loans सुरू, व्याजदर फक्त 8.5%, इतरही अनेक वैशिष्ट्ये

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?