Nitin Gadkari : परमेश्वराचे ब्राह्मणांवर मोठे उपकार, आरक्षणाच्या मुद्यावरून नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, म्हणाले यामुळेच महत्त्व

Brahmins Reservation : सध्या राज्यात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, बंजारा आरक्षण, नाभिक, महादेव कोळी आणि इतर समाजही आरक्षणाविषयी मैदानात उतरले आहेत. कुणाला आरक्षणात वाटा नकोय तर कुणाला त्याच प्रवर्गात आरक्षण हवंय. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

Nitin Gadkari : परमेश्वराचे ब्राह्मणांवर मोठे उपकार, आरक्षणाच्या मुद्यावरून नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य, म्हणाले यामुळेच महत्त्व
नितीन गडकरी
Updated on: Sep 21, 2025 | 10:15 AM

Nitin Gadkari Big Statement : राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून सामाजिक वीण उसवण्याची कामगिरी काही नेते चोखपणे बजावताना दिसत आहेत. काही नेते जाती जातीत तणाव वाढवण्यासाठी सुपारी घेतल्यासारखी वक्तव्य करताना दिसत आहेत. हे नेते जे जिल्हे संवेदनशील आहेत, नेमकं तिथंच जाऊन वक्तव्य करत असल्याने त्यांच्या पाठीमागे कुणाची रसद आहे हे लागलीच समोर ही येते. पण सध्या वातावरण कलुषीत झाले आहे. त्यामुळे जाणकार लोक या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवत आहेत. कुणाचाही रोष नको म्हणून अनेक तज्ज्ञ शांत आहेत. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पूर्वीपासूनच सगळ्यात उजवे दिसतात. त्यांनी आरक्षणाच्या या गोंधळात मोठे वक्तव्य केलं आहे.

राज्यात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, बंजारा आरक्षण, नाभिक, धोबी महादेव कोळी आणि इतर समाजही आरक्षणाविषयी मैदानात उतरले आहेत. कुणाला आरक्षणात वाटा नकोय तर कुणाला त्याच प्रवर्गात आरक्षण हवंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र त्यांची सडेतोड भूमिका मांडली. अर्थात आरक्षणाविषयी प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील. पण गडकरींच्या वक्तव्याकडे पाठ करून नक्कीच चालणार नाही.

परमेश्वराचे ब्राह्मण जातीवर मोठे उपकार

नागपूरमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की,”मी नेहमी गंमतीने सांगतो की परमेश्वराने आमच्यावर सर्वात मोठा उपकार केला असेल तर, मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात महत्त्व नाही ब्राह्मणांचं. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्त्व खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडं जातो. दुबे, त्रिपाठी, मिश्रा त्यांचं राज्य पॉवरफुल आहे. जसं इकडं मराठा जातीचं महत्त्व आहे. तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं महत्त्व आहे.”

कोणतीही व्यक्ती गुणांनी मोठी

तर त्यांनी समाजातील सुशिक्षित वर्गाकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली.  पण मी त्यांना म्हणतो की मी जात-पात पाळत नाही. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस, हा त्याची जात, पंथ, धर्म आणि भाषेने मोठा नाहीये. तर त्याच्या गुणांनी मोठा आहे. ही जी गुणवत्ता आहे, याचा विकास करण्यासाठी समाजातील जे सुशिक्षित लोक आहेत. रिटार्यड आहेत. ज्यांची मुलंबाळं चांगली शिकलेली आहेत. त्यांनी समाजाला सुशिक्षित म्हणवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून द्यायला हवी अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.