Nitin Gadkari : ‘पैसे कमावणे गुन्हा नाही, पण राजकारण पैसे कमावण्याचा…’ असे का म्हणाले नितीन गडकरी; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तुफान फटकेबाजी

Sanghatil Manvi Vyavsthapan : नितीन गडकरी यांनी लिहिलेले 'संघातील मानवी व्यवस्थापन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल नागपूरमध्ये रंगला. आपल्या खास शैलीत गडकरी यांनी तुफान फटकेबाजी केली. 'मी विचार करत नाही, मी निंर्णय घेण्याचा धाडस ठेवतो', असे त्यांनी गमक सांगितले.

Nitin Gadkari : पैसे कमावणे गुन्हा नाही, पण राजकारण पैसे कमावण्याचा... असे का म्हणाले नितीन गडकरी; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तुफान फटकेबाजी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2025 | 8:47 AM

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी नागपूरमध्ये रंगला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे पण उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गडकरी यांनी अनेक विषयांवर नेहमीच्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली. ‘मी विचार करत नाही, मी निंर्णय घेण्याचा धाडस ठेवतो’, असे त्यांनी गमक सांगितले.

पैसे कमावणे गुन्हा नाही

या पुस्तक सोहळ्यात गडकरी यांनी अनेक विषयावर बेधडक मतं मांडली. ही गडकरींची खासियत आहे. आपल्या खास वऱ्हाडी शैलीत ते मत मांडायला मागे पुढे पाहत नाहीत. ‘पैसे कमावणे गुन्हा नाही. मी सर्व कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की, पैसा कमावला पाहिजे. पण राजकारण हा काही पैसा कमावण्याचा धंदा नाही’, असे झणझणीत अंजन त्यांनी घातले.

मी बोललो ते शब्दांकन शैलेश पांडे यांनी केलं, त्यामुळे मी लेखक नाही, मी संघाचा अधिकृत पदाधिकारी नाही, पण स्वयंसेवक आहे. मी जे अनुभवलं ते लिहलं आहे. अनेक वेळा बोलताना मत मांडत होतो, माझा आयुष्यावर ज्या व्यतिचा प्रभाव झाला, त्या अनुभवातून लिहिण्याचं काम केलं. मी ज्ञानी नाही. मी इंजिनियर कॉलेजचा प्रवेश घेऊ शकलो नाही. बीबीसी एजन्सीने ऑफीसमध्ये बोलावलं, माझा औकातीपेक्षा माझी प्रतिमा उंच आहे. असे ते म्हणाले.

मी निर्णय घेण्याचे धाडस ठेवतो

मला एकाने विचारलं खूप विचार करताय, यावर मी उद्या नाश्त्यात काय खाणार हा विचार करतो. मी विचार करत नाही, मी निर्णय घेण्याचा धाडस ठेवतो. मी ठरवलं मी आयुष्यभर सायकल रिक्षात बसणार नाही, हे मानवीय शोषण आहे असे म्हंटलं जात होते. या संकल्पनेतून मेकॅनिज ई रिक्षा आली. यातून दीड कोटी लोक मुक्त झाले, असे उदाहरण गडकरी यांनी दिले.

मी मेरिटचा विद्यार्थी नाही

गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे उदाहरण दिले. ‘no philosophy can be taught to empty stomach.’, उपाशी पोटी तत्वज्ञान कामी येत नाही. मी काही ज्ञानी नाही. मी मेरिटचा विद्यार्थी नाही. चित्रपट अगदी समोर तर नाटक मागे बसून पाहणाऱ्या क्लासमधून वर्गाचा मी प्रतिनिधी आहे. मी अभियांत्रिकीची परीक्षा सुद्धा पास झालो नाही. 12 वीमध्ये मला 52 टक्के मिळाले होते. आता डेहराडून येथे मला डिलिट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

अनेकांचा जामीन घेतला

कार्यकर्तांकची स्थिती आहे. याचा अनुभव घेतला स्टुडंट्स युनियन मध्ये काम करताना अनेक अनुभव आले. युवा च्या निवडणुकीत अनेकदा घेऊन पाहिले प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ता म्हणून किती अडचणी येतात. चांगल्या स्थितीत या गोष्टीचे अडचणी येत नाही पण कार्यकर्त्याची सहनशीलता संवेदनशीलता विकासदृष्टी आणि महत्वाची असते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

संघाच्या आणि स्वयंसेवकांनी कार्यकर्त्याच्या सुख दु:खात सहभागी होऊन घर जोडले. त्या तपश्चर्यातून आमच्या सारख्यांना पद मिळाले. कार्यकर्ते त्यांना काहीच मिळत नाही तरी ते आनंदी आहे. हे सगळे विचारधारेतून मिळालं, असे ते म्हणाले.

जमानत घेण्याचा वारसा मी दत्ताजी दीडोरकर यांच्याकडून शिकलो. मी सुद्धा अनेकांच्या जमानती घेतल्या 20 ते 22 कोटी रुपयांनी या जमानती घेण्यात फसलो आहे. आपण संवेदनशील आहोत. अडचणीत येणार्‍या माणसाच्या कामी पडलं पाहिजे, हा महत्त्वाचा विचार गडकरी यांनी या सोहळ्यात मांडला.

व्यक्ती निर्माणाचा सबंध राष्ट्रनिर्माशी संबंधित आहे. हे कुठे विकत मिळत नाही. अहंकार नाही तर आत्मविश्वास पाहिजे. इच्छाशक्ती पारदर्शकता असली पाहिजे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव पाहिजे. संघ स्वयंसेवक म्हणून शिकलो ते जगातील माणसं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. मॅनेजमेंट गुण आहे स्वभाव आहे हे काम पोहचले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.