AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPl मधील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधानांची भेट, X वर फोटो शेअर करत म्हणाले, त्याच्या क्रिकेट कौशल्याची…

PM Modi Vaibhav Suryavanshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विमानतळावर आयपीएलमधील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. वैभव हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळतो. या भेटीची छायाचित्र स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केले.

IPl मधील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधानांची भेट, X वर फोटो शेअर करत म्हणाले, त्याच्या क्रिकेट कौशल्याची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, वैभव सूर्यवंशीImage Credit source: पंतप्रधानांच्या एक्सवरील अधिकृत खात्यावरून
| Updated on: May 30, 2025 | 3:02 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंश याची त्यांनी पाटणा येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर भेट घेतली. यावेळी वैभव याचे आई-वडील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वैभव आणि त्याच्या कुटुंबाच्या या भेटीविषयीची छायाचित्र अधिकृत सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली. या पोस्टवर अवघ्या काही मिनिटात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.

14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने या आयपीएल हंगामात धमाका केला. त्याच्या स्फोटक फलंदाजीची चर्चा भारताताच नाही तर जगभर होत आहे. वैभव हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवाशी आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने गुजरात टायटल्सविरोधात 35 चेंडूत झंझावती शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने जगाचे लक्ष वेधले होते. तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये वेगवान शतक ठोकण्याचा किताब पण त्याच्या डोईवर आला आहे. त्याने यूसुफ पठाणचा रेकॉर्ड तोडला आहे.

वैभव याच्यावर कौतुकाचा वर्षाव

वैभव सूर्यवंशी या 14 वर्षीय खेळाडूने आयपीएलमध्ये उत्तुंग कामगिरी केली. आज त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केली. त्याच्या क्रिकेटमधील कौशल्याची संपूर्ण देशात कौतुक होत असल्याचे पंतप्रधान यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, कामगिरीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

वैभवची आयपीएलमधील कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या. वैभवने या आयपीएल हंगामात एक शतक आणि एक अर्ध शतक ठोकले. त्याची नुकतीच भारताच्या 19 वर्षाच्या खालील संघात पण निवड झाली आहे. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षीच मोठे धमाके केले आहेत. तो अंडर 19 आशिया कप 2024-25 मध्ये गाजला होता. सूर्यवंशी बिहार राज्याचे प्रतिनिधित्व करतो.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.