एका चुकीची शिक्षा 18 लाख गरिबांना?, नागपुरात वेळेत उचल न केल्याने जानेवारीचे मोफत रेशन नाही

| Updated on: Feb 23, 2022 | 2:03 PM

नागपुरात जानेवारीचे मोफत रेशन मिळणार नाही. वेळेत धान्याची उचल न केल्याचा फटका लाखो रेशनकार्डधारकांना बसणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे लाभार्थी वंचित राहणार असल्याचं रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी सांगितलं.

एका चुकीची शिक्षा 18 लाख गरिबांना?, नागपुरात वेळेत उचल न केल्याने जानेवारीचे मोफत रेशन नाही
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : अन्न पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे नागपुरातील 18 लाख लाभार्थ्यांना फटका बसलाय. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून गरिबांना मोफत धान्य दिलं जातंय. पण, जानेवारी महिन्यासाठी वितरित होणाऱ्या धान्याची एफसीआय गोडाऊनमधून वेळेत उचल झाली नाही. त्यामुळं नागपुरातील लाखो कार्डधारकांना (Lakhs of Cardholders in Nagpur) जानेवारीचं धान्य मिळणार नाही, अशी माहिती रेशन दुकानदार संघाचे (Ration Shopkeepers Association) अध्यक्ष गुड्डू अग्रवाल (President Guddu Agarwal) व महालचे सुनील खंडेलवाल यांनी दिली.

हमालांचे कंत्राट संपले

एफसीआय गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या हमालांचा कंत्राट संपले. याचे कारण देत, जानेवारीच्या धान्याची वेळेत उचल करण्यात आली नाही. आता सरकारने मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळं नागपुरातील लाखो रेशनकार्ड धारकांना जानेवारीचे धान्य मिळणार नाही. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही गरिबांसाठी आहे. त्यांना ही शिक्षा का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

अंत्योदय गटातील 44 हजार रेशनकार्ड

नागपुरात अंत्योदय गटातील 44 हजार 688 रेशनकार्ड धारक आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यसंख्या एक लाख 89 हजार 376 आहेत. तर प्राधान्यगट रेशनकार्डधारक तीन लाख 31 हजार 775 आहेत. यांची सदस्य संख्या 14 लाख 11 हजार 20 आहेत. या लाभार्थ्यांना आता जानेवारीचं धान्य मिळणार नाही, अशी माहिती गुड्डू अग्रवाल व सुनील खंडेलवाल यांनी दिली. यावर संबंधित विभागाने काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.नागपुरात जानेवारीचे मोफत रेशन मिळणार नाही. वेळेत धान्याची उचल न केल्याचा फटका लाखो रेशनकार्डधारकांना बसणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे लाभार्थी वंचित राहणार आहेत. .

नागपुरात भाजीपाल्याला मातीमोल भाव, आवक वाढल्याने पडत्या भावात विक्री, जनावरांना चारावा लागतो भाजीपाला

नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा थरार पाहता येणार! क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

नागपुरात मानवी कवटी आढळल्याने खळबळ, विधवा महिला पाच महिन्यांपासून बेपत्ता, ही कवठी नेमकी कुणाची?