AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात भाजीपाल्याला मातीमोल भाव, आवक वाढल्याने पडत्या भावात विक्री, जनावरांना चारावा लागतो भाजीपाला

नागपूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. त्यामुळं बाजाराच येणारी भाजीपाल्याची आवक जास्त झाली. त्या तुलनेत विक्री होत नाही. त्यामुळं पडत्या भावात भाजीपाला विकावा लागत आहे. भाजीपाला तोडून विक्री करणेही आता शेतकऱ्यांना पडरवण्याजोगे राहिले नाही. भाजीपाला जनावरांना चारावा लागतो.

नागपुरात भाजीपाल्याला मातीमोल भाव, आवक वाढल्याने पडत्या भावात विक्री, जनावरांना चारावा लागतो भाजीपाला
नागपूर बाजारातील भाजीपाला.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 12:00 PM
Share

नागपूर : कळमेश्‍वर भाजी बाजारात (Kalmeshwar Vegetable Market) सांबार, फुलकोबी, वांगे, टमाटर यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने या भाजीपाल्याचे दर कमी झालेत. हिरवाकंच सांबार (Hirvakanch Sambar) फक्त दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. शेतातून तोडून तो बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडत नाहीए. त्यामुळं असा भाजीपाला न तोडता तो जनावरांना चारा म्हणून खाऊ घातला जातो आहे. खरीप हंगामात (Kharif Season) सोयाबीन, कपासी या पिकांना मोठा फटका बसला. उत्पादनात घट झाली. सोयाबीन व कपासीला भाव वाढ मिळाली. त्यामुळं थोडासा दिलासा मिळाला होता. पण, आता भाजीपाल्याच्या पडत्या भावाने भाजीपालात उत्पादक पुन्हा हवालदिल झालाय.

सिंचन वाढल्याने भाजीपाला लागवड

यंदा पावसाळयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. विहिरी व तलावामध्ये मोठा जलसाठा उपलब्ध झालाय. त्यामुळं शेतकरी भाजीपाला पीकलागवडीकडं वळलेत. वांगी, फुलकोबी, टमाटर, मेथी, भाजी, पालक, सांबार, वालाच्या शेंगा, चवळी भाजी यांची लागवड करण्यात आली. त्यामुळं उत्पादन जास्त झाले. म्हणून भाव पडलेत.

तोडणीचा खर्चही परवडेना

नागपूर जिल्ह्यात कळमेश्‍वरचा भाजीबाजार प्रसिद्ध आहे. शेतकरी या बाजारात थेट भाजीपाला विक्रीसाठी आणतात. आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. सांबार, फुलगोबी, पालक, मेथी,टमाटरची मातीमोल भावात विक्री सुरू आहे. लागवड खर्चही निघत नाहीए. या परिस्थितीमुळं भाजीपाला उत्पादक हवालदिल झाला आहे. नागपूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. त्यामुळं बाजाराच येणारी भाजीपाल्याची आवक जास्त झाली. त्या तुलनेत विक्री होत नाही. त्यामुळं पडत्या भावात भाजीपाला विकावा लागत आहे. भाजीपाला तोडून विक्री करणेही आता शेतकऱ्यांना पडरवण्याजोगे राहिले नाही. भाजीपाला जनावरांना चारावा लागतो.

असे आहेत भाजीपाल्याचे भाव

सांभार 10 रुपये किलो, वांगी 20 रुपये किलो, टमाटर 10 रुपये किलो, फुलकोबी 10 ते 15 रुपये फुल, मेथी, गाजर 30 रुपये किलो, कांदा 30 रुपये किलो, बटाटे 20 रुपये किलो

नागपूर कारागृहातील झडतीत गुंडाकडे सापडल्या होत्या तार, टॅबलेट्स; जेलरने खरटपट्टी काढल्याने चिडून केला हल्ला

उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज

पर्यटनाला केव्हा येणार चांगले दिवस?, नागपुरातील पर्यटकांचे जंगल सफारीला प्राधान्य

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.