Nagpur | दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नव’जीवन’; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान

| Updated on: Dec 18, 2021 | 10:41 AM

अवयवदानासाठी डॉ. तपन बोदेले यांनी अंजनकर यांचा मुलगा शुभम, अभिषेक, पत्नी माया व मुलगी प्रगती यांच्याशी संवाद साधला. त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दर्शविला.

Nagpur | दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नवजीवन; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान
organ donation
Follow us on

नागपूर : दोन मेंदूपेशी मृत झालेल्या वृद्ध व्यक्तींच्या अवयवदानातून सहा जणांना जीवनदान मिळाले. तर नेत्रदानातून दोन दृष्टिहिनांना नव्यानं जग बघता येईल. अमरावतीतील तीन मुलींनी पुढाकार घेतल्यानं त्यांच्या वडिलांचं अवयवदान झालं. नांदगाव पेठच्या कडू कुटुंबीयांनी यासाठी पुढाकार घेतला.

ग्रीन कॉरिडोरच्या मदतीनं 190 किमीचा प्रवास

अमरावतीच्या नांदगाव पेठचे गजानन पंजाबराव कडू (65) यांची प्रकृती खराब झाली. त्यांना
16 डिसेंबरला परतवाड्यातील भंसाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना त्याचदिवशी सायंकाळी डॉक्टरांनी तपासून मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर मेंदू मृत समितीचे सदस्य डॉ. आशिष भंसाली यांनी कडू यांच्या मुली मीनल काळे, जावई प्रफुल्ल काळे, माधुरी वानखेडे, प्रियंका लायस्कर यांचे अवयवदानाबाबत समुपदेशन केले. मुलींनी अवयवदानास होकार दर्शविला. 35 ते 40 वाहतूक पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे गजानन कडू यांचे दोन मुत्रपिंड, एक यकृत हे नागपूरला आणण्यात आले. परतवाडा ते नागपूर हे 190 किमीचे अंतर कापण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. ग्रीन कॉरिडोअरच्या मदतीनं अडीच तासांत प्रवास पूर्ण करण्यात आला. यातील एक मूत्रपिंड किंग्सवे हॉस्पिटलमधील 47 वर्षीय पुरुषावर दुसरे मुत्रपिंड मेडिट्रिना हॉस्पिटलमधील 47 वर्षीय महिलेवर तसेच यकृत हे न्यू ईरा हॉस्पिटल येथील 55 वर्षीय पुरुषावर यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले. डॉ. विभावरी दाणी व डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात वीना वाठोडे यांनी अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

अंजनकर कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

नागपूरच्या जरीपटका येथील हुडको कॉलनीतील 60 वर्षीय शेखर खुशाला अंजनकर यांची 13 डिसेंबरला अचानक प्रकृती खालावली. त्यांना सकाळी 9.30 वाजता मेडिट्रिना हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यांच्या चाचण्या केल्या असता त्यांचा रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. दरम्यान, डॉक्टरांकडून त्यांच्यावर उचार करूनही ते प्रतिसाद देत नव्हते. 15 डिसेंबरला येथील डॉक्टरांनी मेंदूमृत्यूची तपासणी केली असता ब्रेन डेड असल्याचे घोषित करण्यात आले. अवयवदानासाठी डॉ. तपन बोदेले यांनी अंजनकर यांचा मुलगा शुभम, अभिषेक, पत्नी माया व मुलगी प्रगती यांच्याशी संवाद साधला. त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दर्शविला.

दोन्ही किडन्या आल्या कामी

डॉ. बोदेले यांनी अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेली यादी तपासणी. त्यानुसार शेखर अंजनकर यांचे यकृत हे मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच एक किडनी ही मेडिट्रिना हॉस्पिटलमधीलच ४७ वर्षीय महिलेवर तर दुसरी किडनी ही केअर हॉस्पिटल येथील ३८ वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आली. त्यांचे हृदय व दोन्ही फुफ्फूस हे त्यांचे वय जास्त असल्यामुळे प्रत्यारोपण करण्यास योग्य नव्हते, अशी माहिती झोनल ट्रासप्लांट कॉर्डिनेशन सेंटरचे सचिव डॉ. संजय कोलते यांनी दिली.

Nagpur | एम्सच्या संचालकांची बनावट इंस्टाग्राम आयडी!, सायबर गुन्हेगारानं लढवली शक्कल, वाचा काय आहे प्रकरण?

Nagpur| विद्यार्थ्याला कोरोनाची लागण; शाळा आठवड्याभरासाठी बंद