Nagpur Crime | धक्कादायक! प्रेमप्रकरणातून गर्भधारणा, 12 वर्षीय मुलीचे लावले लग्न, माझ्या पतीला सोडा मुलीची हाक

मुलगा बावीस वर्षांचा. मुलगी बारा वर्षांची. दोघांचेही सूत जुळले. यातून मुलीला गर्भधारणा झाली. घरच्यांनी दोघांचेही लग्न लावून दिले. प्रकरण पोलिसांत गेले. बारा वर्षीय मुलगी म्हणते माझ्या पतीला सोडा. ही धक्कादायक घटना नागपुरात घडली.

Nagpur Crime | धक्कादायक! प्रेमप्रकरणातून गर्भधारणा, 12 वर्षीय मुलीचे लावले लग्न, माझ्या पतीला सोडा मुलीची हाक
नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाणे
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 9:20 AM

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी (Nagpur MIDC) भागातील धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या 12 वर्षीय मुलीचे लग्न लावले. 12 वर्षीय मुलीचे 22 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध (Love affair with child) होते. या प्रेमसंबंधातून मुलीला गर्भधारणा (Pregnancy through love affair) झाली. हा प्रकार लक्षात आल्यावर दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे लग्न लावले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला अटक केली. माझ्या पतीला सोडा, अशी आर्त हाक निरागस मुलीने पोलिसांना घातली. मी स्वखुशीने त्याच्याशी लग्न केले. यात त्याचा काय दोष असा प्रश्न ती बालिका आता पोलिसांना विचारत आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेलेत. आता करायचं काय असा प्रश्न त्यांनाच पडला.

फेब्रुवारीत उरकले लग्न

मुलीला आई नाही. त्यामुळं ती वडिलांसोबत राहायची. वडील हातमजुरी करतात. गरीब असल्यानं ते कामावर गेले की, तिला कुणाचा आधार नसायचा. अशात तिचे शेजारच्या एका मुलासोबत सूत जुळून आले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जवळचा तो युवक तिला आधार वाटू लागला. अशात त्या दोघांनी मर्यादा ओलांडल्या. त्यातून तिच्या उदरात त्याचे बाळ वाढत होते. ही बाब दोन्ही कुटुंबीयांच्या लक्षात आली. आता काय करायचं असा प्रश्न पडला. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे फेब्रुवारी महिन्यात लग्न उरकून दिले. दोघेही भाड्याच्या खोलीत राहू लागले. ही बाब आशा वर्कर्सच्या लक्षात आली. तिने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.

युवकाविरोधात गुन्हा दाखल

वरिष्ठांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर ती बालिका सैरभैर झाली. ज्याच्या आधाराने ती राहत होती त्यालाच अटक झाली. माझ्या पतीचा गुन्हा काय, असं ती आता विचारत आहे. यावर कुणाचाही आक्षेप नाही मग माझ्या पतीला सोडा, अशी विनवणी ती आता पोलिसांनी करत आहे.

Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात