राहुल गांधी यांचा ताफा आला, पोलिसांनी धक्काबुक्की केली, त्यात नितीन राऊत जखमी

मी स्वतःला सावरलं. डोक्याच्या भारावर सडकेवर पडलो.

राहुल गांधी यांचा ताफा आला, पोलिसांनी धक्काबुक्की केली, त्यात नितीन राऊत जखमी
डॉ. नितीन राऊत हैदराबाद येथे जखमी
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 2:44 PM

नागपूर : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत हे भारत जोडो यात्रेस सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले होते. गर्दीत पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत नितीन राऊत जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात जाईपर्यंत त्यांना बरीच कसरत करावी लागली. त्याची आपबिती त्यांनी आज नागपूर विमानतळावर आल्यावर स्वतः सांगितली. नितीन राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रा सुरू झाली. तेव्हापासून मी त्या यात्रेत सहभागी झालो नाही. मध्यंतरी मला बरं नव्हतं. पण, आता बरं वाटलं. म्हणून यात्रेत सहभागी होण्याचा बेत केला. हैदराबादेत भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायला गेलो. विमानतळावर उतरल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम होता. तिथून पदयात्रा चारमीनार येथून जाऊन कार्यक्रम होणार होता.

ट्रॅफिक बंद असल्यानं पाच किलोमीटर चालत तिथं पोहचलो. स्टेजजवळ पोहचणार येवढ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा ताफा आला. तिथं प्रचंड गर्दी होती. पोलीस अस्वस्थ झाली. पोलीस लोकांवर तुटून पडले. पोलीस लोकांना बाजूला करायला लागले. मी कॉर्नरला होतो. स्वतः एसीपी त्याठिकाणी होते. चार पोलिसांनी जोरात धक्का दिला. त्यामुळं खाली पडलो. डोक्याला मार लागला.

मी स्वतःला सावरलं.डोक्याच्या भारावर सडकेवर पडलो. जोरात मार लागला. सारखं रक्त वाहायला लागलं. अडीच मिनिटं रक्त वाहत होतं. पण, कुणी आलं नाही. पोलीस धावले नाही. कार्यकर्त्यांनी घेरा मारला. अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते जमले. त्यांना मला सावरलं.

एकानी थंड्या पाण्याची बॉटल डोक्यावर टाकली. तरीही रस्तस्त्राव थांबत नव्हता. त्यानंतर आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. एका अॅब्युलन्समध्ये पोहचलो. त्यामधून फर्स्ट एड्स देण्यात आली. रक्तस्त्राव थांबत नसल्यानं रुग्णालयात पाठविण्यात आलं.

दीड किलोमीटर गेल्यानंतर विचारलं कुणाकडं गाडी आहे का. त्यानंतर दुचाकीनं रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर उपचार झाला. उजव्या डोळ्याच्या वर मार लागला. आतमध्ये थोडा हेअरलाईन क्रॅक झालेलं आहे.डोळा थोडक्यात वाचला.

रुग्णालयात जाईपर्यंत राहुल गांधी आणि मल्लीकार्जुन खर्गे यांचे फोन आले. इंडियन युथ काँग्रेसचे अध्यक्ष भेटायला आले. उपचार झाल्यानंतर नितीन राऊत आज विमानतळावर नागपुरात परतले. त्यावेळी ते बोलत होते.