
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणर्थ नागपूर महानगरपालिकेने उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन MTDC (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ने महानगरपालिकेची परवानगी न घेता उध्वस्त केले आहे. हे आंबेडकर भवन आहे त्याच ठिकाणी पुन्हा उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली. नागपूर महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या या जातीयवादी व राक्षसी कृतीमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे कवाडे म्हणाले. (Reconstruct Dr. Ambedkar Bhavan; Jogendra Kawade’s demand to Nitin Raut)
नागपूर महानगरपालिकेने MTDC ला या जागेचे हस्तांतरण विशिष्ट शर्तीनुसार केले होते. या शर्तीचे पालन न केल्यामुळे नागपूर महानगरपालिकेने ही जमीन परत मागितली आहे. असे असताना सुद्धा महानगरपालिका पूर्व सूचना न देता “सांस्कृतिक भवन” जमीनदोस्त करण्यात आले. खरे तर सांस्कृतिक भवनासह पर्यटन स्थळ विकसित करता आले असते,प रंतु “संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असलेल्या द्वेषापोटी सांस्कृतिक भवन जमीनदोस्त करण्यात आल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये निर्माण झाली असल्याचे कवाडे म्हणाले.
महानगरपालिका आणि शासनाच्या या अक्षम्य कृतीमुळे आंबेडकरी समाजात प्रचंड रोष व असंतोष धुमसत आहे. असंतोषाचे उद्रेक टाळण्यासाठी पूर्वीच्याच ठिकाणी सौंदर्यकरणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर “सांस्कृतिक भवनाचे पुनर्निर्माण करण्याच्या मागणीचा आपण व राज्य शासनाने गंभीरपणे विचार करावा, असे प्रा. कवाडे व जयदीप कवाडे यांनी आजच्या भेटीत नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. या प्रसंगी अरुण गजभिये, बाळू घरडे, दिनेश अंडरसहरे, अजय चव्हाण, कैलाश बोंबले, विपीन गडगीलवार, कपिल लिंगायत, नीरज पराडकर, कुशी नारा सोमकुवर, कुंदन उके आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
नागपूरमधील व्यापारी आक्रमक, पालकमंत्र्यांची भेट, दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी
MPSC सदस्यांच्या नियुक्तीवरुन नवा वाद, आयोगावर फक्त मराठा सदस्य असल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप
राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार
(Reconstruct Dr. Ambedkar Bhavan; Jogendra Kawade’s demand to Nitin Raut)