Nana Patole | सोशल मीडियासाठी भाजपचे रोज 40 कोटी खर्च, नाना पटोलेंची टीका; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही ट्रेनिंग

| Updated on: May 28, 2022 | 1:03 PM

भाजपच्या भाडोत्री लोकांना तोंड देता यावं म्हणून आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सोशल मिडियाचं ट्रेनिंग देतोय. त्यांना स्पर्धेत कसं टिकता येईल. यावर प्रशिक्षण देणार आहोत. देशव्यापी कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे. देशाचं संविधानिक व्यवस्था वाचविणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे, यासाठी काँग्रेसही आता सोशल मीडियाचा वापर करतंय, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

Nana Patole | सोशल मीडियासाठी भाजपचे रोज 40 कोटी खर्च, नाना पटोलेंची टीका; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही ट्रेनिंग
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us on

नागपूर : नागपुरात काँग्रेसच्या (Congress) सोशल मीडियाच्या (Social Media) राष्ट्रीय कार्यकारिणीची (National Executive) दोन दिवसीय बैठक होत आहे. यासाठी देशातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही नागपुरात आले. नाना पटोले म्हणाले, भाजप चव्वणीछाप काम करतं. रोज 40 कोटी रुपये खर्चून सोशल मीडिया चालवतात. भाजपच्या भाडोत्री लोकांना तोंड देता यावं म्हणून आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सोशल मिडियाचं ट्रेनिंग देतोय. त्यांना स्पर्धेत कसं टिकता येईल. यावर प्रशिक्षण देणार आहोत. देशव्यापी कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे. देशाचं संविधानिक व्यवस्था वाचविणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे, यासाठी काँग्रेसही आता सोशल मीडियाचा वापर करतंय, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

हनुमान चालिसा हा आस्थेचा विषय

यावेळी ते म्हणाले, माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या हनुमान चालिसात काँग्रेसला रस नाही. धर्म हा आस्थेचा विषय आहे. मी हनुमान चालीसा वाचून घरून निघतोय. आमची आस्था आहे. राणा दाम्पत्यावर काहीही बोलणार नाही. तो काही आमचा विषय नाही. हनुमान चालिसा हा आस्थेचा विषय आहे. त्याची जाहिरात आम्ही केली नाही. पण, केंद्राला आठ वर्षे झाली. मूळ प्रश्न वेगळे आहेत. मोदी सरकारने देश विकून चालवण्याचं काम चालवलंय. देशात गरिबी, महागाई हे मोठे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न असताना हनुमान चालिसात आम्हाला काही रस नाही, असं नाना पटोले म्हणाले.

वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट

नाना पटोले यांनी सांगितलं की, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. आर्यन खान विषयावर आम्ही आमची भूमिका मांडली होती. वानखेडेवर काहीही कारवाई होणार नाही. कारण वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रियांका गांधी यांना तिकीट मिळाली. तर सर्व काँग्रेस स्वागत करणार आहे. हायकमांडच्या निर्णयावर आमचं लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपला विरोध करण्यासाठी शिबिर

नागपुरात काँग्रेसचे दोन दिवसीय राष्ट्रीय सोशल मीडिया संकल्प शिबिर होत आहे. या शिबिराचे उद्घाटन शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतील. या शिबिराला काँग्रेसचे महाराष्ट्रातील मंत्री, ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सोशल मीडियामधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप नेहमीच काँग्रेस बाबत अपप्रचार करते, खोटा इतिहास सांगते. त्यामुळं त्याला विरोध आणि उत्तर देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.