AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Sardesai | संजय राऊतांनी हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, नागपुरात वरुण सरदेसाई यांचे वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं कारवाई केली. यावर वरुण सरदेसाई म्हणाले, संजय राऊतांनी हाक द्यावी. शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत. नागपुरात वरुण सरदेसाई बोलत होते.

Varun Sardesai | संजय राऊतांनी हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, नागपुरात वरुण सरदेसाई यांचे वक्तव्य
नागपुरात बोलताना वरुण सरदेसाईImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 12:25 PM
Share

नागपूर : युवा सेनेचा निश्चय दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. त्याचाच दुसरा भाग म्हणून विदर्भात मेळावे ( Vidarbha Melawa) आहेत. युवा सेनेचं काम चांगलं सुरु आहे. युवा सेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी नागपुरात दिली. शिवसेना कुणाची टीम आहे, असं मला वाटत नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत आहे. संजय राऊत शिवसेनेची बुलंद तोफ आहे. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी राऊत साहेब यांची महत्त्वाची भूमिका आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक हाक द्यावी. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक, युवासैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांच्या झालेली ईडीची (ED ) कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही.

25 वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल

वरुण सरदेसाई म्हणाले, दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. हा राग आहे. हाच गुन्हा आहे का? गेले दोन अडीच वर्षे आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशी वक्तव्य करतात. दर 15 दिवसांनी तारीख देतात. पाच वर्षे नाही तर पुढील 25 वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल. आणि उद्धवजी मुख्यमंत्री दिसतील, असंही सरदेसाई यांनी सुनावले.

नागपुरात शिवसेना वादळ आणणार

नागपूर शिवसेनेत जुने आणि नवीन कार्यकर्ते असा वाद सुरू आहे. याबद्दल विचारलं असता, वरुण सरदेसाई म्हणाले, नागपुरात जुने-नवीन आता एकत्र आले आहेत. अनेक नवीन लोक आमच्यासोबत येतात. जुने नवीन यांचा मेळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुनी नवीन टीम मिळून शिवसेनेचं वादळ निर्माण करणार आहेत. विदर्भात मंत्रीपदाबबात पॅाझिटिव्ह निर्णय होणार आहे. विदर्भावर अन्याय होणार नाही.

Nagpur IPS woman officer : धक्कादायक ! नागपुरात आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, चोरीही, पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे

Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?

Nagpur Suicide | मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण, नागपुरात 13 वर्षांच्या बलिकेची आत्महत्या

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....