Nagpur Canal | नागपुरात नहराचे काम निकृष्ट, सिमेंटच्या ठिकाणी राखेचा वापर, संजय सत्येकार यांचा आरोप

| Updated on: May 17, 2022 | 9:44 AM

या नहराच्या कामात सिमेंटचा वापर करायला पाहिजे. पण, सिमेंट महाग आहे. कोळशाची राख ही सिमेंटसारखी दिसते. राख ही स्वस्त मिळते. त्यामुळं सिमेंटच्या ऐवजी राख वापरली जाते. यामुळं काम निकृष्ट होते. कामाचा दर्जा हा अतिश खराब असतो. पण, यात ठेकेदाराला जास्त कमाई होती.

Nagpur Canal | नागपुरात नहराचे काम निकृष्ट, सिमेंटच्या ठिकाणी राखेचा वापर, संजय सत्येकार यांचा आरोप
सिमेंटच्या ठिकाणी राखेचा वापर, संजय सत्येकार यांचा आरोप
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : कोळशाच्या राखळीचा वापर करून नहर बनविले जात आहे, असा आरोप संजय सत्येकार (Sanjay Satyekar) यांनी केला आहे. हा प्रकार पारशिवनी तालुक्यातील टेकाडी येथील सिंचन विभागात सुरू आहे. पेंच पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) टेकाडी उपविभाग (Tekadi Sub-Division) अंतर्गत येणाऱ्या बोर्डा रोड ते गहुहिवरा रोडपर्यंत फोर-वेला लागून जाणाऱ्या नहराचे 7 किलोमीटर लाइनिंग सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू आहे. या कामात सिमेंटच्या जागी कोळशाच्या राखळीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार हे भ्रष्ट काम करत आहेत. दरवर्षी नहराचे वारंवार काम केले जाते. जनतेच्या कराच्या पैशाचा चुराडा हे ठेकेदार आणि अधिकारी करतात. एकीकडे शेती व शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. दुसरीकडे हे भ्रष्ट लोक सरकारच्या तिजोरीची लूटमार करत आहेत.

सिमेंट ऐवजी कोळशाची राख

या नहराच्या कामात सिमेंटचा वापर करायला पाहिजे. पण, सिमेंट महाग आहे. कोळशाची राख ही सिमेंटसारखी दिसते. राख ही स्वस्त मिळते. त्यामुळं सिमेंटच्या ऐवजी राख वापरली जाते. यामुळं काम निकृष्ट होते. कामाचा दर्जा हा अतिश खराब असतो. पण, यात ठेकेदाराला जास्त कमाई होती. अधिकाऱ्यांशी त्यांची मिलीभगत असल्यानं ते कारवाई करत नाहीत, असा आरोप सत्येकार यांनी लावला आहे.

जनतेच्या पैशाची धुळधाण

नहराचं काम हे सरकारी पैशातून होते. लोकं कर देतात. त्या पैशातून हे काम केलं जाते. लोकांच्या कराच्या पैशाची अशाप्रकारे धुळधाण सुरू आहे, असाही आरोप सत्येकार यांनी केलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात प्रकरणात लक्ष लागून संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलंय. महाविदर्भ शेतकरी संघटनेचे संजय सत्येकार यांनी सरकारला व या विभागाचे मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे. या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा