सनफ्लॉवर हॉस्पिटलवर 1 लाख रुपयांचा दंड, नागपूर मनपाने का केली कारवाई?

| Updated on: Mar 10, 2022 | 11:31 AM

नागपूर महापालिकेच्या उपद्रव विरोधी पथकाने सनफ्लावर हॉस्पिटलवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय प्लास्टिकचा वापर करणाऱ्या काही प्रतिष्ठानांकडून दंड वसूल केला.

सनफ्लॉवर हॉस्पिटलवर 1 लाख रुपयांचा दंड, नागपूर मनपाने का केली कारवाई?
संबंधित प्रतिष्ठानांवर कारवाई करताना मनपाचे कर्मचारी.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने (Noisy Research Squad) बुधवारी धरमपेठ झोन अंतर्गत व्ही.आय.पी.रोड रामदासपेठ येथील सनफ्लॉवर हॉस्पिटलवर (Sunflower Hospital ) कारवाई केली. बायो मेडिकल वेस्ट (Bio Medical Waste) सामान्य कचऱ्यामध्ये टाकल्यामुळे रुग्णालयावर रुपये एक लाख रुपयांचा दंड लावला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ, व्हीसीए स्टेडियम, सिव्हील लाइन्स सदर येथील हँडलुम एक्सपोवर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

प्लास्टिक दुकानांवरही कारवाई

याशिवाय पथकाद्वारे धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील अमेसर ॲण्ड कंपनी या दुकानावर कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत गोळीबार चौक इतवारी येथील नानक प्लास्टिक आणि राजेश प्लास्टिक या दुकानांवर कारवाई करून दहा हजार रुपये दंड वसूल केला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. उपद्रव शोध पथकाने बुधवारी पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून एक लाख वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार आठ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये पाचशे प्रमाणे चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 45, 662 नागरिकांविरुध्द कारवाई केली. आतापर्यंत 2 कोटी 11 लाख 90 हजारांचा दंड वसूल केला आहे. बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे धंतोली झोन अंतर्गत 1, गांधीबाग झोन अंतर्गत 2, आशीनगर झोन अंतर्गत 3 आणि मंगलवारी झोन अंतर्गत 2 जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली. आतापर्यांत 40 हजार 192 बेजबाबदार नागरिकांकडून 2 कोटी 96 हजार वसूल करण्यात आले आहे.

ओबीसी क्रांती मोर्चाचा भंडाऱ्यात एल्गार, जुनी पेन्शन योजना पूर्ववत का लागू करावी?

Video – Amravati Fire | भंगाराच्या गोदामाला भीषण आग! चांदुरबाजारच्या रहिवासी भागात धुळीचे लोट

Nagpur Crime | कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार