Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ

| Updated on: Dec 23, 2021 | 1:30 PM

विशाल त्याच्या स्कूटरनं रात्री नऊ वाजताच्या सुमारास रणजितच्या सांगण्यावरून भिलगावला गेला. तिथे सर्व जणांनी दारू ढोकसली. तिथेच विशालला मारहाण करण्यात आली.

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : कामठी तालुक्यातील वारेगाव शिवारात 22 मार्च 2007 च्या रात्री विशाल पैसाडेचा मृतदेह सापडला होता. खापरखेडा पोलिसांनी त्या प्रकरणाचा 14 वर्षांनंतर तपास लावला. या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रणजित सफेलकर, विनय बाथव, हेमंत गोरखा, राजू भद्रे, संजय भद्रे, गौरव झाडे व तुषार दलाल यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

असा रचला कट

रणजित सफेलकरने 22 मार्च 2007 च्या रात्री विशाल पैसाडेला घरी बोलावले. त्याने विनय बाथवच्या मदतीनं राजू भद्रेची स्कार्पिओ भिलगाव येथे मागविली होती. हेमंत गोरखालाही बोलावले होते. विशाल त्याच्या स्कूटरनं रात्री नऊ वाजताच्या सुमारास रणजितच्या सांगण्यावरून भिलगावला गेला. तिथे सर्व जणांनी दारू ढोकसली. तिथेच विशालला मारहाण करण्यात आली.

अपघात नव्हे घात

रणजित सफेलकर, हेमंत गोरखा, विनय बाथव यांनी विशालला स्कार्पिओत बसविले. वारेगाव शिवारात पुलाजवळ आणले. मोहम्मद आरीफ हा विशालची स्कूटर घेऊन रात्री साडेबारा वाजता वारेगाव शिवारात आला. तिथे विशालला रोडवर झोपवून त्याच्या डोक्यावर स्कूटर मांडली. रणजितच्या सांगण्यावरून विनयने स्कार्पिओने स्कूटरला धडक देत विशालच्या शरीरावरून नेली. या अपघातात विशालचा मृत्यू झाला, असे दाखविण्यात आले.

अनैतिक संबंधाचा होता संशय

विशाल हा रणजितचा भाऊ कल्लूचा मित्र होता. विशालचे रणजितच्या घरी येणे-जाणे होते. त्याचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा रणजितचा संशय होता. साथीदारांच्या मदतीनं अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची कबुली आता रणजितने पोलिसांसमोर दिली. रणजितची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या प्रकरणात विनय बाथव याने पोलिसांना खोटे बयाण दिले होते.

Video – Nagpur | रिलायन्सच्या गोदामाला आग, कोट्यवधींचे नुकसान; आगीचे कारण काय?

Gadchiroli | हत्तींची विदर्भात दस्तक! शेतकऱ्यांचे नुकसान; हत्तींनी स्वीकारला अधिवास

Chandrapur | कुठेही थुंकत असाल तर सावध व्हा! थुंकणे पडले चारशे रुपयांना; दोन तासांची कोठडी