Nagpur Accident : नागपूर-उमरेड हायवेवरील अपघातात टवेराचा चक्काचूर, दोन्ही लेनवर ट्रॅफिक जाम, क्रेनने गाड्या हटवल्या; सातही मृतांची ओळख पटली

| Updated on: May 07, 2022 | 10:49 AM

घटनेनंतर उमरेड मार्गावर वाहतूक खोळंबली होती. उमरेड पोलिसांनी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. टवेरात एकूण आठ जण होते. त्यात एका चिमुकलीचाही समावेश आहे.

Nagpur Accident : नागपूर-उमरेड हायवेवरील अपघातात टवेराचा चक्काचूर, दोन्ही लेनवर ट्रॅफिक जाम, क्रेनने गाड्या हटवल्या; सातही मृतांची ओळख पटली
नागपुरातील उमरेड रोडवर भीषण अपघात
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : उमरेडवरून नागपूरकडे (From Umred to Nagpur) प्रवासी घेऊन टवेरा ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. ही टवेरी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. यात टवेरातील 7 जणांचा मृत्यू झाला. टवेरात एकूण आठ जण होते. त्यापैकी एका चिमुकलीला साधी खरोचसुद्धा आली नाही. शुक्रवारी रात्री 10.30 वाजता उमरगाव राम कुलर कंपनीजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये 6 पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. रस्त्यावरून जाणारे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. टवेरात काहीजण अडकून पडले होते. टवेराला मागे काढल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. आत रक्ताचा सडा सांडला होता. चालकासह पाच जणांचा जागीत मृत्यू झाला होता. हुडके‌श्वर पोलिसांचा (Hudkeshwar Police) ताफा घटनास्थळी पोहोचला. पाचगाव पोलीस चौकीतील (Pachgaon Police Station) कर्मचारीही मदतीसाठी धावले. तीन जखमींना नागपूरच्या मेडिकलच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यापैकी दोघांना रस्त्यात मृत्यू झाला.

अशी आहेत मृतांची नावे

टवेरा चालक हा उप्पलवाडीतील पिवळी नदीजवळ राहणारा सागर शेंडे याचा जागीच मृत्यू झाला. बेझनबागेतील नझूल ले-आउटमधील मेघा आशिष भुजाडे, इंदोऱ्यातील देविदास गेडाम, व नरेश डोंगरे, पद्माकर भालेराव, मेघना पाटील यांचाही जागीच मृत्यू झाला. चालक सागर शेंडे हा एमएच 31- सी 4315 क्रामांकाची टवेरातून प्रवासी घेऊन नागपूरकडे परत येत होता. रात्रीची वेळ असल्याने सागरने टवेराचा वेग फारच वाढविला होता. एमएच 40- बीजी 7757 क्रमांकाचा टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा होता. ही बाब सागरच्या लक्षात आली नाही. टिप्पर उभे असल्याचे लक्षात येताच सागरने करकचून ब्रेक दाबला. पण, वेग फार अधिक असल्याने टवेरा अनियंत्रित होऊन टिप्परवर धडकली. अपघातग्रस्त टवेरा टिप्परच्या आतच अडकून पडली.

देव तारी त्याला कोण मारी

घटनेनंतर उमरेड मार्गावर वाहतूक खोळंबली होती. उमरेड पोलिसांनी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड मृतक व जखमीच्या कुटुंबीयांनी मेडिकलमध्ये धाव घेतली. टवेरात एकूण आठ जण होते. त्यात एका चिमुकलीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीला साधे खरचटलेही नाही. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. याचा प्रत्यय या चिमुकलीच्या बाबतीत आला. टवेरातील सात जण जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराच्या चिंधळ्या उडाल्या. एवढा भीषण अपघात झाला असताना चिमुकलीला फारसे काही लागले नाही. तिची प्रकृती बरी आहे.

हे सुद्धा वाचा