MLC Election प्रशासन लागले कामाला, पदाधिकारी भूर्र…, समिती सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर

| Updated on: Nov 28, 2021 | 6:57 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे सदस्य परराज्यात टूरवर गेले आहेत. काँग्रेसचे सदस्यही टूरवर जाणार असल्याची चर्चा आहे. मतदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे.

MLC Election प्रशासन लागले कामाला, पदाधिकारी भूर्र..., समिती सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथील निवडणूक विषयक प्रशिक्षणात उपस्थित कर्मचारी.
Follow us on

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मतदान 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती मतदान करतात. मतविभाजन होऊ नये, यासाठी मतदारांना सांभाळून ठेवावे लागते. याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या सदस्यांना टूरवर नेल्याची माहिती आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्यांची नियुक्ती लांबणीवर पडली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे सदस्य परराज्यात टूरवर गेले आहेत. काँग्रेसचे सदस्यही टूरवर जाणार असल्याची चर्चा आहे. मतदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 58 सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये भाजपचे 14, काँग्रेसचे 33, राष्ट्रवादीचे 8, शिवसेना 1, गोगपा एक शेकाप एक मतदान करणार आहेत. सदस्य पर्यटनावर गेल्यानं विषय समित्यांच्या नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहेत. 12 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांची नियुक्ती झाली होती.

कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण

मतदानाच्या दिवशी मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेचे काम जबाबदारीने पार पाडावे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेबाबत सर्व माहिती घेऊन सर्व मतदानाचा सराव करून योग्य पध्दतीने प्रक्रिया राबवावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक माधवी खोडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मतदानाचे काम जिकरीचे असल्यानं जबाबदारीनं काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या. सर्व मतदान केंद्राधिकारी यांनी मतदानाच्या अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार ई-पीक व ओळखपत्राच्या आधारे मतदानास पात्र राहील, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदान केंद्रात जांभळा स्केच पेन आवश्यक आहे अन्यथा मतदान अवैध होईल. ओळख स्लिपवर कोणत्याही पार्टीचे नाव राहू नये, नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांचे ओळखपत्र पात्र राहील, असेही त्यांनी सांगितलं.

 

3 उमेदवार निवडणूक रिंगणात

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी 5 उमेदवारी अर्ज आले होते. प्रफुल्ल गुडधे, सुरेश रेवतकर या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे- भारतीय जनता पार्टी, रवींद्र (छोटू) भोयर- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, मंगेश देशमुख अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहेत. 10 डिसेंबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत निवडणूक होणार आहे. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.

बारमालकांनो सावधान! बिल मागितले म्हणून बार पेटविण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून लावली आग

MLC election सारे काही पर्यटनासाठी, नगरसेवकांना नाही फोन उचलायला वेळ