विदर्भात थंडी संपली आता उन्हाचे चटके, पारा पोहोचला 38 अंशावर, हवामानाचा अंदाज काय?

| Updated on: Mar 15, 2022 | 11:27 AM

15 मार्च रोजी चंद्रपुरात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून ही 41 अंश सेल्सिअस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यात आज 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. उद्या तो येत्या आठवड्यात 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

विदर्भात थंडी संपली आता उन्हाचे चटके, पारा पोहोचला 38 अंशावर, हवामानाचा अंदाज काय?
विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पारा 16 मार्चपासून चाळीशी पार करणार आहे. उद्यापासून नागपुरात 40 ते 41 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा जाणार आहे. त्यामुळं दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. विदर्भात थंडी संपली असून, आता उन्हाचे चटके लागायला सुरुवात झालीय. ऐरवी मार्च महिन्यात जेमतेम थंडीची सुरुवात होत असते. पण यंदा आताच सूर्य आग ओकायला लागलाय. नागपूरसह विदर्भात (Vidarbha including Nagpur) पारा वाढायला लागला. तापमान 38 अंशांवर पोहोचलंय. या महिन्यात शेवटपर्यंत तापमान 40-41 अंशावर जाणाची शक्यता आहे. चटके लागायला सुरुवात झाली. दिलासा मिळावा म्हणून लोक शितपेय किंवा उसाचा (soft drinks or sugarcane juice) रस घेताना दिसतायत.

उद्यापासून असे राहणार तापमान

15 मार्च रोजी चंद्रपुरात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून ही 41 अंश सेल्सिअस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यात आज 40 डिग्री सेल्सिअस तापमाना उद्या तो येत्या आठवड्यात 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातही तापमान उद्यापासून 41 डिग्री अंस सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार आहे. अशीच काहीसी परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यात राहणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे.

कशी घ्याल काळजी

दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे. हलके, पातळ तसेच सुती कपडे वापरावे. घराबाहेर पडताना सनग्लास, छत्री, स्कार्प, टोपी यांचा वापर करावा.

पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी, अमरावतीच्या शेतकऱ्याची लेक विदर्भात प्रथम

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?