पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी, अमरावतीच्या शेतकऱ्याची लेक विदर्भात प्रथम

अमरावतीतील शेतकऱ्याची लेक पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीत विदर्भातून पहिली आली. अचलपूर तालुक्यातील धनोडा या गावात धनश्री सगणे ही विद्यार्थिनी रहाते. 2018 पासून तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या परीक्षेसाठी तिने तयारी सुरू केली.

पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी, अमरावतीच्या शेतकऱ्याची लेक विदर्भात प्रथम
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीत विदर्भातून पहिली येणारी धनश्री सगणे.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:56 AM

स्वप्निल उमप

अमरावती : आयुष्यात महत्वाच्या टप्प्यात काही वर्षांपूर्वी शेतकरी बापाच दुर्दैवी निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी जन्मदात्या आईवर आली. पण शेतकऱ्याची लेक धनश्री खचून गेली नाही. तिला तिच्या आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यासाठी तिनं जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. 2019 मध्ये तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा (Sub-Inspector of Police Examination) दिली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या धनोडा (Dhanoda of Achalpur) या खेड्या गावातील धनश्री भाऊराव सगणे ही पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पाहिल्याच टप्प्यात पास झाली. पण पुढे आव्हान होत शारीरिक चाचणी पास होण्याचं. त्यासाठी धनश्री भाऊराव सगणे (Dhanashree Bhaurao Sagane) या विद्यार्थ्यांनी अफाट मेहनत घेतली. नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीत विदर्भातून पहिली येण्याचा तिने मान मिळवला आहे.

पहिल्याच टप्प्यात उत्तीर्ण

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धनोडा या गावात धनश्री सगणे ही विद्यार्थिनी रहाते. 2018 पासून तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या परीक्षेसाठी तिने तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने परीक्षा दिली. पहिल्याच टप्प्यात ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने शारीरिक चाचणी दिली. यामध्ये ती विदर्भातून पहिली आली आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्द हेच यशाचे गमक असल्याचं धनश्री सगणे यांनी सांगितलं.

मेहनतीने मिळाले यश

गावात राहणारी मुलगी ही झेप घेईल, असं वाटत नव्हतं. पण, तिने चिकाटी सोडली नाही. मेहनत घेतली. वडील गेल्याचं दुःख होतं. पण, दुःखी राहण्यापेक्षा तिने मेहनतीवर भर दिला. त्यामुळं ती आता इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.  धनश्रीने सरावाला सुरुवात केली तेव्हा पहिल्या दिवशी लोखंडी गोळा फेकल्या जात नव्हता. आता ती सहा-सात मीटरपर्यंत गोळा फेकते. आईला फोन केला. तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते. धनश्रीचा अभ्यास सुरूच आहे. पुढं तिला डीवायएसपी बनायचं आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी खचून जाऊ नये, असं धनश्रीचं म्हणणं आहे.

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ

Nagpur Crime | तुरुंगातच प्रकृती बिघडली, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांचा एकामागून एक मृत्यू

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.