नवाब मलिकांच्या आरोपावर मुन्ना यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले, माझ्याविरोधातील गुन्हे राजकीय

| Updated on: Nov 10, 2021 | 5:00 PM

नागपूर : मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मुन्ना यादव यांच्यावर गुंड असल्याचा आरोप केला. त्यावर मुन्ना यादव यांची आपले स्पष्टीकरण दिले. माझ्याविरोधात राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण मुन्ना यादव यांनी दिले. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते. चौकशीला सामोरे जाण्यास तयार मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना अशा गुंड […]

नवाब मलिकांच्या आरोपावर मुन्ना यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले, माझ्याविरोधातील गुन्हे राजकीय
मुन्ना यादव
Follow us on

नागपूर : मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मुन्ना यादव यांच्यावर गुंड असल्याचा आरोप केला. त्यावर मुन्ना यादव यांची आपले स्पष्टीकरण दिले. माझ्याविरोधात राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण मुन्ना यादव यांनी दिले. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते.

चौकशीला सामोरे जाण्यास तयार

मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद कस दिलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. त्यावर स्पष्टीकरण देताना मुन्ना यादव म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे. त्यात काहीही सापडले नाही. सरकार त्यांचे आहे. आता पुन्हा चौकशी करावी. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही यादव म्हणाले.

मलिकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही

नवाब मलिक यांचे संबंध अडरवर्ल्डशी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर मलिक यांनी आपण हायट्रोजन बाँब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, मलिक यांनी फडणवीस यांच्यावर सरळ कोणत्याही प्रकारचे आरोप केले नाहीत. फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी आहेत. मुन्ना यादव यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यादव हे फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपिठावर दिसतात. यावर यादव म्हणाले, मी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील नगरसेवक होतो. त्यामुळं त्यांच्यासोबत फोटो असणे काही बातमीचा विषय नाही. मी काही गुंड प्रवृतीचा व्यक्ती नाही. उलट मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी कागदोपत्री स्पष्ट केले. त्यामुळे मलिक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचाही कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, असेही यादव म्हणाले.

मलिकांच्या विरोधात दावा ठोकणार

मलिक यांनी मला गुंड संबोधून प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं मुन्ना यादव यांनी सांगितलं. यासाठी वकिलांचा सल्ला घेणार आहेत. यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कैदेत गेले आहेत. शिवसेनेच्या संजय राठोड या माजी मंत्र्याना राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केल्यामुळं आता मलिकांनाही काहीच सूचत नाही. त्यामुळं अशाप्रकारचे खोटे आरोप केले जात आहेत, असेही यादव म्हणाले.

म्हणे हायट्रोजन बाँब, निघाला फुस्सी बाँब

फडणवीस यांच्या आरोपानंतर हायट्रोजन बाँब फोडणार असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. परंतु, फडणवीसांच्या विरोधात एकही प्रकरण सापडले नाहीत. त्यामुळं माझे नाव पुढे करून अशाप्रकारे खोटे आरोप केला जात आहेत. मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर हायट्रोजन बाम्ब टाकणार असे म्हटले होते. पण, हा फुस्सी बाँब निघाला, असेही यादव म्हणाले. माझ्यावर गुन्हे सिद्द झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेणार अन्यथा मलिक यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, असे आव्हानही यादव यांनी दिले.

हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल, आशिष शेलारांचा घणाघाती हल्ला

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…