AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar: मराठा-ओबीसींच्या हातात घंटा… जरांगेंच्या आंदोलनानंतर विजय वडेट्टीवार यांच्या विधानाची जोरदार चर्चा, कुणावर टीका?

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सातत्याने टीका करत आहेत. आताही त्यांनी काल अंतरवाली सराटीत घडलेल्या घडामोडींवर सडेतोड मत मांडले. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही तोंडसुख घेतले आहे.

Vijay Wadettiwar: मराठा-ओबीसींच्या हातात घंटा... जरांगेंच्या आंदोलनानंतर विजय वडेट्टीवार यांच्या विधानाची जोरदार चर्चा, कुणावर टीका?
विजय वडेट्टीवार, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 31, 2026 | 11:58 AM
Share

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आमरण उपोषणाचं शस्त्र बाहेर काढले. त्यांच्या या आंदोलनामुळे एकच धावपळ उडाली. सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला. या सर्व घाडमोडीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा तोंडसुख घेतले. विजय वडेट्टीवार हे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. तर यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा आणि ओबीसी समाजाचा हातात घंटा देण्याचे काम

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस सरकारवर यावेळी टीका केली. डबल ढोलकी सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात घंटा देण्याचे काम केले. जरांगे पाटील उपोषणाला बसले सरकारने तोडगा काढला. यात ५८ लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही एकीकडे मुख्यमंत्री ओबीसी बाजू मांडतात. विखे पाटील मराठा समाजाला सांगत आहे मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांना विरोधात उभ करून सत्तेची खुर्ची मजबूत करायची आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे सरकार लबाड

तर ओबीसी आणि मराठा या दोघांनी महायती सरकारवर विश्वास ठेवू नये असे वडेट्टीवार म्हणाले. हे लबाडाचे सरकार आहे, यावर विश्वास ठेवू नका. ओबीसी समाजाने लक्षात ठेवावे हे सरकार तुमच्या बाजूने नाही. त्यांनी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. ओपन मध्ये कॅटेगरी लोकांना स्थान राहिलेलं नाही. या दुतोंडी सरकारवर विश्वास ठेवू नका. ओबीसींचे नुकसान होत आहे तर आपल्याला लढावं लागेल ,रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही लवकरच याची घोषणा करू असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

वडेट्टीवार आंदोलन करणार?

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकार ओबीसींचे नुकसान करत असल्याचा आरोप करत आता मैदानात उतरण्याची आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी लवकरच ओबीसींच्या मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट