Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या आंदोलनात घुसलं कोण? पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणाचा घेताय शोध? पंकज भोयर यांची खळबळजनक माहिती

Pankaj Bhoyar on Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्या मुंबई आंदोलनाने अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. अगोदर या वकीलाने पोलिसात तक्रार दिली. आता पोलिसांनीच सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली आहे. काय आहे पोलिसांचा आणि गृहखात्याचा संशय?

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या आंदोलनात घुसलं कोण? पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणाचा घेताय शोध? पंकज भोयर यांची खळबळजनक माहिती
पंकज भोयर, अभिजीत दिपके
| Updated on: Oct 03, 2026 | 10:40 AM

गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: कॉकरोच जनता पार्टीने काल दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर स्थानिकांचाही विरोध होता. याप्रकरणी एका वकिलाने तक्रार दिली. त्याआधारे आता गुन्हाही दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. पण एक धक्कादायक दावाही करण्यात येत आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

दिपके यांच्या आंदोलनात असामाजिक तत्व?

Loading...

भाजपने छोटे पक्ष संपवण्याचा डाव आखला आहे. त्यासाठी छोट्या शेल कंपन्या स्थापन केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी काल केला होता. त्यावर गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सडकून टीका केली. भाजपने सेल कंपन्यांचं रॅकेट उघड केलं. संपूर्ण देशात सर्वांना पक्ष उघडण्याचा अधिकार, अभिजित दिपके यांना सेल कंपन्यांबाबत केलेला आरोप चुकीचा आहे. चुकीचा नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण कोणाला, सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला तर कारवाई होणार असे भोयर यांनी स्पष्ट केले.

कोणालाही अटक करण्याचा डाव नव्हता. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असेल तरच पोलीस त्या ठिकाणी कारवाई करतात. सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनात असामाजिक तत्व सहभागी झाल्याची तक्रार मिळाली आहे. आता पोलीस सीसीटीव्हीतून शोध घेत आहेत अशी मोठी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

रोहित पवार यांच्या आंदोलनावर काय म्हणाले?

आमदार रोहीत पवार यांनी समजून घेतलं पाहिजे एमपीएससीचं पद घटनात्मक आहे. कोणालाही हटवता येणार नाही. त्याची एक प्रक्रिया आहे, असे भोयर म्हणाले. नाईलाजे एकत्र आलेले पण महाविकास आघाडीत आहे. त्यांच्यात समन्वय नाही. जमतेनं त्यांना नाकारलं नाही. जागा जाहिर करण्यात विश्वासात न घेतल्याने नाराजी आहे. त्याचे परिणाम या निवडणुकीत होईल, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपचे नाही तर महायुती म्हणून निवडणूक लढणार. अर्ज भरण्याच्या आधी उमेदवार जाहीर होणार असे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर आता 15 ठिकाणी मदत केंद्र

समृद्धी महामार्गावर अपघात कमी करण्यासाठी 15 ठिकामी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. काही चालक नियम पाळत नाही, त्यामुळे अपघात होतात. येणाऱ्या काळात समृद्धीवरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी आणखी सीसीटीव्ही वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमांची पायमल्ली होऊ नये, टोलवरून बेकायदा वाहनं सोडणार नाही यांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती  गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी  दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us