तुमचं नाव बदललं तर चालेल काय?; उद्धव ठाकरे यांचा थेट निवडणूक आयोगालाच संतप्त सवाल

| Updated on: Jul 10, 2023 | 11:39 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा विदर्भ दौरा आहे. आज ते अमरावतीत आले. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

तुमचं नाव बदललं तर चालेल काय?; उद्धव ठाकरे यांचा थेट निवडणूक आयोगालाच संतप्त सवाल
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडील शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर खुद्द उद्धव ठाकरेंपासून शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टीका केलेली आहे. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मनातील निवडणूक आयोगाच्या विरोधातील खदखद बाहेर आली आहे. आमच्या पक्षाला माझ्या वडिलांनी नाव दिलं होतं. त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी तुम्हाल ते हिरावून घेऊ देणार नाहीच, असा इशारा देतानाच तुमचं नाव बदललं तर चालले काय?, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

उद्धव ठाकरे कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमधील जनतेशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पूर्वी पक्ष फोडले जायचे. त्यात काही नवीन नव्हतं. आता पक्षच पळवले जात आहेत. पक्षावरच दावा केला जात आहे. माझ्या वडिलांनी पक्षाला नाव दिलं होतं. ते नाव चोरलं आहे. मी ते जाऊ देणार नाही. नाव माझं आहे. माझंच राहील. मी त्यांनी देऊ देणार नाही. तो त्यांचा अधिकार नाही. ते चिन्ह देऊ शकतात. पक्षाचं नाव नाही. निवडणुकीत आम्ही नियम पाळतो की नाही हे पाहणं आयोगाचं काम आहे. पक्षाचं नाव काढून घेणं हे काम नाही. उद्या आयोगाचं नाव आम्ही बदललं तर काय म्हणाल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

राज्यभर फिरणार

सध्या जाहीर सभांचा सीजन नाही. सभांसाठी फिरत नाही हे मी आधी जाहीरच केलं आहे. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. वर्षभर महाराष्ट्रातील कार्यकर्ते रोज मातोश्रीवर येत आहेत. भेटत आहेत. सर्वांना मातोश्रीवर येणं शक्य होत नाही. पाऊस संपल्यावर आपल्याकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद होणं महत्त्वाचा आहे. आव्हानात्मक काळात जे कट्टर शिवसैनिक माझ्या सोबत आहेत, त्यांनी भेटणं हे कर्तव्य आहे. म्हणून मी कालपासून फिरायला सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात फिरणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अल्टिमेटम दिला नाही

प्रकाश आंबेडकर यांनी अल्टिमेटम दिला आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांना आम्ही जागा वाटपाचा प्रस्ताव मागितला आहे. दोन महिने झाले आहेत. प्रस्ताव आल्यावर चर्चा करू. पुढे बघू कसं करायचं ते. आंबेडकरांनी अल्टिमेटम दिला नाही. घाईगडबडीत कुणी प्रस्ताव देणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.