‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’ मंत्री असूनही नागपूर मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’, विजय वडेट्टीवारांचा इशारा

| Updated on: Sep 11, 2021 | 7:33 AM

नागपूर मेट्रोमध्ये भरती करताना आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त झाले असून ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’, असा इशारा त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.

‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’ मंत्री असूनही नागपूर मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’, विजय वडेट्टीवारांचा इशारा
Vijay Wadettiwar
Follow us on

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. नागपूर मेट्रोमध्ये भरती करताना आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त झाले असून ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’, असा इशारा त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे.

मेट्रो प्रशासनावर एफआयर करणार

नागपूर मेट्रोनं ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार’ असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा देत या प्रश्नी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार घेणार असल्याचं म्हटलं आहे. ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. ‘मंत्री असूनंही मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’ असल्याचा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मेट्रो भरती घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचंही ते म्हणाले.

युवक काँग्रेसकडून मेट्रो भवनला घेराव

नागपूर मेट्रोमध्ये आरक्षणाला बगल देत खुल्या प्रवर्गातून अधिक उमदेवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला होता. पवार यांच्या आरोपानंतर विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. नागपूर मेट्रोत पदभरती करताना आरक्षण डावलले, आणि बहुजन समाजावर अन्याय केला, असा आरोप करत गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर मेट्रो भवनला घेराव घालण्यात आला.

प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. काँग्रेस कार्यकर्ते मेट्रो भवनच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असल्याने, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी “आरक्षण डावलून पदभरती, नोकरभरतीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत, मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षीत यांनी खुल्या वर्गाच्या जास्त जागा भरल्या’ असा आरोप शिवानी वडेट्टीवार यांनी केला होता. बिंदू नामावली जाहीर केली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी दिला आहे.

नागूपर मेट्रोवर आरक्षणाला डावलल्याचा आरोप का?

नागपूर मेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देऊन खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 650 जागा भरण्यात आल्या. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय करण्यात आला, असा आरोप प्रशांत पवार यांनी केला होता. एससी प्रवर्गाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. तसेच या महामेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

नागपूर मेट्रोमधील प्रवर्गनिहाय पदसंख्या आणि भरलेली पदे

एससी जागा – 132 ( घेतले 42)

एसटी जागा – 66 ( घेतले 24 )

ओबीसी जागा – 238 ( घेतले 113 )

इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)

खुला प्रवर्ग जागा – 357 ( घेतले -650)

इतर बातम्या:

नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप, मेट्रोनं चूक दुरुस्त करावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती घोटाळा; ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले, खुल्या प्रवर्गावर प्रशासन मेहरबान ?

Vijay Wadettiwar said Nagpur Metro must follow the rules of reservation then ready for legal action