AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती घोटाळा; ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले, खुल्या प्रवर्गावर प्रशासन मेहरबान ?

एससी समाजाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे.

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती घोटाळा; ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले, खुल्या प्रवर्गावर  प्रशासन मेहरबान ?
PRASHANT PAWAR NAGPUR METRO
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 7:47 PM
Share

नागपूर : नागपूर मेट्रोत पदभरतीमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांनी केलाय. नागपूर मेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देऊन खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 650 जागा भरण्यात आल्या. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय करण्यात आला, असा आरोप प्रशांत पवार यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते. (NCP leader Prashant Pawar alleges in Nagpur Metro recruitment administrator appointed open category candidates on the seat of OBC SC NT candidates)

खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का?

एससी समाजाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना सेवेत घेण्यात आले आहे. तर एसटी प्रवर्गाच्या 66 जागा असताना फक्त 24 जणांना सेवेवर घेतलंय. ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना नोकरी देण्यात आली आहे, असं प्रशांत पवार यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. तसेच या महामेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

आरक्षणाच्या धोरणाला तितांजली दिल्याचा सूर

दरम्यान, प्रशांत पवार यांनी हे गंभीर आरोप केल्यानंतर महा मेट्रोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र प्रशांत पवार यांच्या या आरोपांनतर नागपूर मेट्रोने आरक्षणाच्या धोरणाला तितांजली दिल्याचा सूर तीव्र होत चालला असून नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशांत पवार यांनी दिलेली माहिती

एससी जागा – 132 ( घेतले 42)

एसटी जागा – 66 ( घेतले 24 )

ओबीसी जागा – 238 ( घेतले 113 )

इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12)

खुला प्रवर्ग जागा – 357 ( घेतले -650)

नागपूर मेट्रोमधून 2 डोस घेतलेल्यांना प्रवासास मुभा

दरम्यान, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना नागपूर मेट्रोमधून प्रवास खरण्याची मुभा मेट्रो प्रशासनाने दिली आहे. मेट्रो प्रशासनाने आपल्या सूचनेत “शासकीय आदेशाप्रमाणे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी/अधिकारी, तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नागरिक मेट्रो रेलने प्रवास करू शकतात.  प्रवास करण्यास पात्र असणाऱ्या प्रवाशांना लसीकरणाच्या दोन मात्रा (डोज) घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल,” असे म्हटलेले आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

कोर्टकचेरीनंतर राणेंचा नरमाईचा सूर; मुख्यमंत्र्यांना ‘महाशय’, तर शिवसेनेला ‘विरोधी मित्र’ म्हणाले

MIG -21 Crash : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 फायटर जेट क्रॅश, पायलट बचावला

Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

(NCP leader Prashant Pawar alleges in Nagpur Metro recruitment administrator appointed open category candidates on the seat of OBC SC NT candidates)

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.