नागपूर मेट्रोमधून प्रवास करण्यास मुभा, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचा पुरावा दाखवणे बंधनकारक, वाचा नियम काय ?

हाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सविस्तर सूचना जारी केली आहे. मेट्रोमधून प्रवास करायचा असेल तर लसीच्या दोन्ही मात्रा (डोज) घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे.

नागपूर मेट्रोमधून प्रवास करण्यास मुभा, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचा पुरावा दाखवणे बंधनकारक, वाचा नियम काय ?
NAGPUR METRO

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना नागपूर मेट्रोमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सविस्तर सूचना जारी केली आहे. मेट्रोमधून प्रवास करायचा असेल तर लसीच्या दोन्ही मात्रा (डोज) घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. (travelling through Nagpur metro will be allowed for common people from 15 August)

नागपूर मेट्रोच्या काय सूचना ?

लसीच्या दोन्ही मात्रा ज्या प्रवाशांनी घेतलेल्या आहेत. त्यांना लोकल तसेच मेट्रोने प्रवास करण्यास मुभा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असं ठाकरे म्हणाले होते. याच निर्णयानूसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सूचना जारी केली आहे.

“शासकीय आदेशाप्रमाणे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी/अधिकारी, तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नागरिक मेट्रो रेलने प्रवास करू शकतात. या निर्देशांप्रमाणे प्रवास करण्यास पात्र असणाऱ्या प्रवाशांना लसीकरणाच्या दोन मात्रा (डोज) घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल. महा मेट्रोच्या अ‌ॅक्वा आणि ऑरेंज या दोन्हीही मार्गिकांवर हे निर्देश 15 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील,” असं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 9 ऑगस्ट रोजी केली होती. तसेच त्यांनी नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले होते.

इतर बातम्या :

..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल

निर्बंध शिथील तरीही नागपूरचे व्यापारी आक्रमक, व्यापाऱ्यांना नेमकी कशाची भीती?

आरटीईच्या निधीत मोठा घोटाळा, नागपुरातील 25 शाळा व्यवस्थापनाचा गंभीर आरोप, याचिका दाखल

(travelling through Nagpur metro will be allowed for common people from 15 August)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI