नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप, मेट्रोनं चूक दुरुस्त करावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 4:04 PM

मेट्रोतील या पदभरती घोटाळा प्रकरणावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघंही आक्रमक झालाय.ओबीसी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

नागपूर मेट्रोत ओबीसींना डावलल्याचा आरोप, मेट्रोनं चूक दुरुस्त करावी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनाचा इशारा
NAGPUR METRO

नागपूर: नागपूर मेट्रोमध्ये पदभरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवारांना डावलण्यात आलंय, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. खुल्या वर्गाच्या उमेदवारांवर मेट्रो प्रशासनानं मेहरबानी दाखवलीय, त्यामुळे मेट्रोतील या पदभरती घोटाळा प्रकरणावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघंही आक्रमक झालाय.ओबीसी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

मेट्रोनं चूक दुरुस्त करावी

‘महामेट्रोनं पद भरती करताना ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय केलाय. मेट्रोनं मोठी चूक केलीय, त्यामुळं मेट्रो प्रशासनानं ही चूक दुरुस्त करावी, अन्यथा मेट्रो विरोधात आंदोलन करू’ असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिलाय.

प्रशांत पवार यांचा दावा नेमका काय?

नागपूर मेट्रोवर पदभरती महाघोटाळ्याचा गंभीर आरोप लावण्यात आलाय. आरक्षण धोरणाला बगल देऊन, खुल्या प्रवर्गाला 357 जागा असताना ओपनच्या तब्बल 650 जागा भरण्यात आल्याय. तर 2015 ते 2021 या काळातील पदभरतीत ओबीसी, एससी आणि एनटी समाजावर मोठा अन्याय झाल्याचा आरोप, प्रशांत पवार यांनी केलाय. एससी समाजाच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना घेतलेय, एसटीच्या 66 जागा असताना 24 जण घेतलेय, तर ओबीसी समाजाच्या 238 जागा असताना फक्त 113 जणांना घेतलंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केलाय. महा मेट्रोच्या महापदभरती घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

शिवसेना खासदार कृपाल तुमाने मुख्यमंत्र्यांना भेटणार

महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा झाल्याचा आरोप करत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने आक्रमक झाले आहेत. खासदार तुमाने थेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. तसंच या प्रश्नी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत. शिवसेना खा. कृपाल तुमाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे याच प्रकरणाची तक्रार करणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाला मेट्रोकडून तिलांजली दिली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून चौकशीची करणार मागणी असल्याचं खासदार तुमाने यांनी सांगितलं आहे.

नागपूर मेट्रोमधील प्रवर्गनिहाय जागा आणि भरलेली पदं

एससी जागा – 132 ( घेतले 42 ) एसटी जागा – 66 ( घेतले 24 ) ओबीसी जागा – 238( घेतले 113 ) इडब्लूएस जागा – 88 ( घेतले 12) ओपन जागा – 357 ( घेतले -650 )

आरक्षणाचे नियम पाळले, मेट्रोचा दावा

राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते प्रशांत पवार यांनी केलेल्या आरोपांवर नागपूर मेट्रोकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मेट्रोत पदभरती करताना आरक्षणाचे निकष पाळल्याचं नागपूर मेट्रोचे पीआरओ अखिलेश हळवे यांनी सांगितले.

इतर बातम्या:

महामेट्रोने आरक्षणाला तिलांजली दिलीय, एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, शिवसेना खासदार आक्रमक

नागपूर मेट्रोत पदभरतीमध्ये आरक्षणाला तिलांजली दिल्याचा आरोप,आता मेट्रो प्रशासन म्हणतं…

OBC leader Babanrao Taywade gave warning to Nagpur Metro follow principal of Reservation

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI