महामेट्रोने आरक्षणाला तिलांजली दिलीय, एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, शिवसेना खासदार आक्रमक

महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा झाल्याचा आरोप करत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने आक्रमक झाले आहेत. खासदार तुमाने थेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. तसंच या प्रश्नी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत.

महामेट्रोने आरक्षणाला तिलांजली दिलीय, एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, शिवसेना खासदार आक्रमक
कृपाल तुमाने
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 10:11 AM

मुंबई : महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा झाल्याचा आरोप करत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने आक्रमक झाले आहेत. खासदार तुमाने थेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. तसंच या प्रश्नी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत.

आरक्षणाला मेट्रोकडून तिलांजली, एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

शिवसेना खा. कृपाल तुमाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे याच प्रकरणाची तक्रार करणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाला मेट्रोकडून तिलांजली दिली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून चौकशीची करणार मागणी असल्याचं खासदार तुमाने यांनी सांगितलं आहे.

खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का?

एससीच्या 132 जागा असताना केवळ 42 उमेदवारांना नोकरी दिली गेली. ओबीसीच्या 238 जागा असताना केवळ113 जणांना नोकरी दिली गेली तसंच खुल्या वर्गात 357 जागा असताना 650 उमेदवारांना नोकरी दिली गेली मग खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का?, असा सवाल खासदार कृपाल तुमाने यांनी विचारला आहे. तसंच आरक्षणाच्या धोरणाला मेट्रोकडून तिलांजली दिली गेल्याचा आरोप तुमाने यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

महामेट्रोने नोकरभरतीमध्ये एसटी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील लोकांना त्यांचा आरक्षण वाटा दिलेला नाही. बहुतांश अधिकारी पद विनाआरक्षित कोट्यातून भरून मागासवर्गीयांवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. याच पदभरती घोटाळ्याबाबत शिवसेना आक्रमक झाली आहे.

(Shivsena MP krupal Tumane Aggressive Over reservation Appointment mahametro nagpur)

हे ही वाचा :

उड्डाणानंतर पायलटच्या छातीत जोराची कळ, नागपूर विमानतळावर परदेशी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? नागपूरमधील 700 हून अधिक पालकांचा सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.