नागपूर : आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? आमच्या पाल्यांना कुणी शाळेत प्रवेश देता का प्रवेश? जंगल आणि शिवारा शिवारात भटकंती करणाऱ्या भारवाड समाजातील पालकांची ही व्यथा आहे. देशात शिक्षणाचा कायदा येऊन 11 वर्षे लोटले, तरिही समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचले नाही. एकट्या नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजातील जवळपास 700 मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत दाखला मिळावा म्हणून पालक भटकंती करतायत.