महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य, यशोमती ठाकूर यांची माहिती

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला आळा बसावा, तसेच याबाबत योग्य जनजागृती व्हावी यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे.

महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य, यशोमती ठाकूर यांची माहिती
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला आळा बसावा, तसेच याबाबत योग्य जनजागृती व्हावी यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. आता महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याचा महत्त्वाचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

महिलांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र, कित्येकदा महिला अशा लैंगिक छळाच्या घटना घटनांची तक्रार करताना दिसत नाहीत. महिलांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होत राहते. मात्र, त्याविरोधात समोर येऊन आवाज उठवण्यास महिला कचरत असल्याचे चित्र अनेकदा दिसते. वास्तविक कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध,मनाई आणि निवारण कायदा 2013 हा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी महिला या कायद्याचा योग्य वापर करताना दिसत नाहीत.

महाविद्यालय स्तरावर जनजागृती

कामाच्या ठिकाणी अन्याय होऊनही महिलांकडून त्याचा वापर होत नसल्यानं आता महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला आळा बसेल असा विश्वास महिला आणि बालविकास विभागाला वाटतो आहे. महिला व बालकल्याण विभागानं यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश पुस्तिकेत अथवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 याची विस्तृत माहिती दिली जाणार आहे. महाविद्यालयांनी आपल्या प्रवेश पुस्तिकेत अथवा संकेतस्थळावर या कायद्याची माहिती देणे 2021- 22 पासून अनिवार्य करण्यात आले आहे . या जनजागृतीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक या जनजागृतीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या:

कोर्टकचेरीनंतर राणेंचा नरमाईचा सूर; मुख्यमंत्र्यांना ‘महाशय’, तर शिवसेनेला ‘विरोधी मित्र’ म्हणाले

सन्मान समारंभ नीरज चोप्रासाठी ठरले अडचणीचे, सराव सुरु करण्यास विलंब, डायमंड लीगलाही हुकणार

Yashomati Thakur said all colleges should publish content of prevention of sexual harassment in prospects and Websites

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI