Wardha River : वर्धा नदी कोपली, मोवाडमध्ये 204 जणांना गिळले, 31 वर्षांपूर्वीच मोवाडचा थरकाप उडविणार थरार

कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्र रूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र 1991 च्या महापुराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत.

Wardha River : वर्धा नदी कोपली, मोवाडमध्ये 204 जणांना गिळले, 31 वर्षांपूर्वीच मोवाडचा थरकाप उडविणार थरार
31 वर्षांपूर्वीच मोवाडचा थरकाप उडविणार थरार
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 10:37 PM

नागपूर : जिल्ह्याच्या मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे आजपासून 31 वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात 204 नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला 31 वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत. मोवाड गावाला 1991 च्या महापुराने असंख्य वेदना आणि आठवणी आजही कायम आहे. नदीच्या काठावरील 12 गावांवर वर्धा नदी (Wardha River) कोपली होती. तिने मोवाड येथील 204 जणांना गिळंकृत केले होते. मोवाडवासी आजचा दिवस काळादिवस म्हणून पाळतात. मोवाड हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे. मोवाड हे नरखेड (Narkhed) तालुक्यातील गाव आहे. वर्धा नदीच्या काठावर हे गाव आहे. रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्याआधीच संपूर्ण मोवाड गाव जलमय (Jalmay) झाले होते.

mowad new 2

वर्धा नदी कोपली, मोवाडमध्ये 204 जणांना गिळले

12 गावांवर वर्धा नदी कोपली

कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्र रूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र 1991 च्या महापुराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे. एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या 12 गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील 204 जणांना गिळंकृत केले होते.

महापुराने मोवाडचे चित्र बदलले

आज या घटनेला 31 वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात. मोवाड नगरपालिकेची स्थापना 17 मे 1867 ला झाली. त्याला 154 वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा विणकरांची मोठी बाजारपेठ होती. सोबातचं इथली बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे. मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.