Vidarbha Schools | विदर्भातील शाळा केव्हापासून सुरू होणार? 27 की, 29 जून याबाबत संभ्रम कायम; शिक्षणाधिकारी म्हणतात, लवकरच शासनाकडून सूचना येतील

| Updated on: Jun 16, 2022 | 10:31 AM

शिक्षण आयुक्तालयाकडून 9 जूनला पत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार, 24 ते 25 जूनदरम्यान शिक्षण-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे. स्वच्छता व शाळेच्या सौंदर्यीकरणाकडं लक्ष द्यावं. आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात. त्यानंतर 27 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं, असं सांगण्यात आलं.

Vidarbha Schools | विदर्भातील शाळा केव्हापासून सुरू होणार? 27 की, 29 जून याबाबत संभ्रम कायम; शिक्षणाधिकारी म्हणतात, लवकरच शासनाकडून सूचना येतील
विदर्भातील शाळा केव्हापासून सुरू होणार?
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : विदर्भातील शाळा 27 जूनपासून की 29 जूनपासून संभ्रम कायम आहे. 27 जूनपासून शाळा सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. आता शिक्षण विभागाने (Education Department) नव्याने काढलेल्या आदेशात (Order) विद्यार्थ्यांना 29 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत बोलवावे, असे नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही आदेशामुळे शाळा नेमकी कोणत्या दिवशी सुरू करावी, असा पेच शाळा आणि शिक्षण विभागासमोर पडला आहे. शाळा 27 जूनपासून सुरू होणार या दृष्टीने शिक्षण विभागासह स्थानिक शाळा प्रशासनाने (Administration) तयारी सुरू केली आहे. मात्र अचानक आलेल्या शासन निर्णयामुळे शिक्षण विभागासमोर आता शाळा नेमक्या कधीपासून असा पेच निर्माण झालाय. यावर उपसंचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती आहे.

पहिला आदेश

विदर्भात जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही तापमान जास्त असते. त्यामुळं विदर्भातील शाळा जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतात. 27 जून 2022 पासून शाळा सुरू होण्याचे पूर्वनियोजित आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून 9 जूनला पत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार, 24 ते 25 जूनदरम्यान शिक्षण-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे. स्वच्छता व शाळेच्या सौंदर्यीकरणाकडं लक्ष द्यावं. आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात. त्यानंतर 27 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं, असं सांगण्यात आलं.

दुसरा आदेश

त्यानंतर 10 जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं एक पत्र जारी केलं. त्यानुसार 27 आणि 28 जून रोजी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे. स्वच्छतेबाबत लक्ष द्यावं. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात. 29 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं, असं नमून करण्यात आलंय. या दोन तारखांमुळं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

हे सुद्धा वाचा

शासन सूचनेनुसार निर्णय

शाळा कोणत्या तारखेला सुरू करायच्या यासंदर्भात शासनाकडं मार्गदर्शन मागविण्यात आलं. याबाबत सूचना प्राप्त होतील. त्यानुसार, शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी सांगितलं. कोविडमुळं गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी काही दिवसांसाठी शाळा सुरू झाल्या होत्या. पण, बरेच निर्बंध होते. यामुळं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी इच्छुक आहेत. पालकही केव्हा एकदा मुलं शाळेत जातात, याची वाट पाहत आहेत. त्यामुळं केव्हापासून शाळा सुरू होणार याबाबत स्पष्टता केव्हा होते, याची वाट पाहत आहेत.