मनोरुग्णाचं औषध धाडणाऱ्या भाजपला नाना पटोले म्हणतात, पत्ता चुकीचा कोल्हापूरचा हवा होता…

चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

मनोरुग्णाचं औषध धाडणाऱ्या भाजपला नाना पटोले म्हणतात, पत्ता चुकीचा कोल्हापूरचा हवा होता...
नाना पटोलेंचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 10:39 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो (Nana Patole) विरुद्ध भाजप (Bjp) संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत (Pm Modi) नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पोटेले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी गावगुंडाबद्दल बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करूदे, कोर्टात तक्रारी करू द्या, कोर्ट जो निर्णय देईल त्याचा आदर राखू असे नाना पोटोले म्हणालेत, तसेच चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

तसेच मी विधानसभा अध्यक्ष असतो तर काय केलं असतं हे देशाला दिसलं असतं. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ दिले नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. निवडणूक जवळ येते तेव्हा तेव्हा भाजपाकडून हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचे काम करतात. भाजप सरकारच्या काळात 53 टक्के बेरोजगारी वाढली आहे. अशी टीका नाना पटोलेंनी केलीय. बियर शॉपी रेशनच्या दुकानात सुरू करणे असो किंवा राज्यात डान्सबार सुरू करणे असो हेही निर्णय फडणवीसांच्या काळात घेतले गेले. अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

तसेच अधिकाधिक लोक काँग्रेससोबत कसे जोडले जातील या संदर्भात आमचं काम सुरू आहे. 7 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. नितीन राऊत काल प्रभारी यांना भेटायला आले होते, त्यांचा कोणताही नाराजीचा सूर अमच्याविरोधात नव्हता, असेही पटोलेंनी स्पष्ट केले आहे. अनेक पक्षांनी घोषणा केल्या आहेत. ज्या काही निवडणुका झाल्यात त्यात अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस डिजिटल मेम्बरशिप करणार, कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना काँग्रेसचा विचार सांगणार आणि सदस्य करून घेणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

राज्यातील 75 हजार बुथवर ‘मन की बात’ होणार, महाराष्ट्रात कमबॅकसाठी भाजपचा प्लॅन काय? वाचा

भाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप

VIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा